
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यात विकास कामाचा देखावा करण्याकरिता विद्यमान लोकप्रतिनिधी यांनी विकास कामाचा देखावा करताना विविध गावात भूमिपूजनाचा सपाटा सुरू केला होता त्यामध्ये सर्व स्तरावरील कर्मचारी तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य व इतर पदाधिकारी सर्व उपस्थित राहून लाडकी या गावातील पुलाचे खूप मोठ्या प्रमाणात भूमिपूजन करण्यात आले परंतु गेल्या आठ महिन्यापासून कोणतेही काम पूर्णत्वास येत नाही किंवा साधी त्याची हातही लावण्याची पद्धत दिसत नाही फक्त लोकांना दाखवण्याकरिता भुमन पूजन केले का असा लाडकीवासीयांना प्रश्न मनामधे निर्माण होत आहे,त्यांचा प्रश्न आहे की जर काम होत नसेल तर लोकांना लालच दाखवून आपल्या आदीन करण्याचा हा राजकीय हेतू तर नाही ना? असा प्रश्न सामान्य जनतेत उपस्थित होत आहेत दिनांक ९ तारखेला झालेल्या ढगफुटीमुळे लाडकी येथील पुलावरून जात असताना काही लोकांचे प्राण वाचले परंतु तेच काम भूमिपूजन झाल्यानंतर गेल्या आठ महिन्यापासून अजून झाले नाही, जर झाले असते तर आज रोजी ती नौबत आली नसती असा प्रश्न लाडकी वासियांना पडत आहे, भूमिपूजन करणे म्हणजेच काम होणे हे नाही तर काम झाल्यावर पूजन करावे असा लाडकी येथील जनतेलाच नाही तर संपूर्ण तालुक्यातील जनतेला प्रश्न निर्माण होते काम झाल्यावर त्याचा श्रेय घेण्यास काहीही हरकत नाही परंतु कोणतेही काम होण्याच्या अगोदर पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य उद्घाटनाच्या वेळेस हजर राहून आपले बाहुले साधून घेतात परंतु त्यावर कोणतेही लक्ष राहत नाही त्यामुळे लाडकी येथील पुलाचे काम लवकरात लवकर मार्गी लावावेत असा संदेश लाडकी येथील शंकर राऊत व जनतेने दिला आहे.
