
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्या अर्तंगत येत असलेल्या झरगड येथे काराई गोराई माता व हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ यांच्या वतीने दिनांक २१ फेब्रुवारी रोजी ५ वाजता प्रो कबड्डी सामन्याचे उदघाटन मोठ्या थाटात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अँड प्रफुल्लभाऊ मानकर यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून यवतमाळ जिल्हा सेवादल अध्यक्ष अरविंदभाऊ वाढोणकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अंकुशभाऊ मुनेश्वर ,निश्चलजी बोबाटे, शामकांतभाऊ येणोरकर, संरपच सौ चंदाताई आत्राम, गजाननराव कुळकर्णी, प्रसादभाऊ कुळकर्णी, विस्वासजी किणवटकर, किशोरभाऊ धामंदे, प्रफुल्लभाऊ तायवाडे, पुरूषोत्तमराव चिडे, यवतमाळ जिल्हा आदिवासी संघटनेचे अध्यक्ष नरेशराव गेडाम, ग्रामपंचायत सदस्य सचिनजी राडे, अँड संदीपजी राडे, मोहनराव आत्राम,चन्द्रभानजी वगारहांडे, अजाब आत्राम, गोविंद झाडे या सह अनेक मंडळी उपस्थित होते त्यावेस कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रफुल्लभाऊ मानकर यांनी आपले विचार मांडले असता कबड्डी खेळाचे आयोजन प्रत्येक गावामध्ये करायला पाहिजे जेनेकरुन आपल्या गावाचा खेळाडु प्रो कबड्डी स्पर्धेत सहभागी होईल आज मोठ्या प्रमाणावर प्रो कबड्डी स्पर्धाचे राज्य स्तरावर सामन्याचे आयोजन होत असते असे प्रतिपादन करण्यात आले तर अरविंदभाऊ वाढोणकर यांनी आपले विचार मांडले तर उदघाटन प्रसंगी दहा मिनिटाचा सामना भरविण्यात आला होता त्यावेळेस सर्व खेळाडुनां मार्गदर्शन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे आयोजन राजुजी राडे, प्रकाशजी झाडे,जिवनजी मेत्राम,सतिशजी पचारे,योगेशजी लढी यांनी केले होते सूत्रसंचालन देवेंद्रजी आत्राम यांनी केले हा कार्यक्रम यशस्वीते करीता रवि राऊत,संभा पंधरे, महिन्द ऊईके,प्रभाकर नेहारे,श्रमिक राडे,अंकुश वगारहांडे,गोपाल नेहारे, रमन पंधरे,रवि झाडे,चिंतामण लांभाडे,दिलीप राऊत,विनोद गेडाम, मनोज पचारे यांनी केले.
