शिक्षकाने छत्रपती शिवजयंतीला केले ४० वे रक्तदान,रक्तदानाची जनजागृती करणारा शिक्षक राजेंद्र टेकाडे

देहदनाचा केला संकल्प

  तालुका प्रतिनिधी /१९ फेब्रुवारी

काटोल – शिक्षकांना सामाजिक अभियंता म्हटले जाते.समाजात नवचेतना प्रदान करण्यासाठी काही शिक्षक विविध उपक्रम राबवून सामाजिक दायित्व पार पाडीत असते. असाच एक अवलिया शिक्षक ‘रक्तदान चळवळ’ सक्षम करण्यासाठी स्वकृतीतून समाज संदेश देत आहे.
जि.प.स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र, काटोल येथील केंद्र समन्वयक राजेंद्र रामहरी टेकाडे रक्तदान करण्याविषयी मागील १७ वर्षांपासून जनजागृती करीत आहे.स्वतः आज शिवजयंतीला आयुष्यातील ४० वे रक्तदान केले असून त्यातील २५ वेळा रक्तदान शिवजयंतीला केलेले आहे.
तसेच, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे ‘देहदान संकल्प’ केलेला आहे.कारण मृत्यूनंतर देह मातीत पुरला जातो किंवा जाळला जातो.मात्र वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देह मिळाल्यास त्याचा उपयोग शैक्षणिक कार्यासाठी होतो असे त्यांचे मत आहे.
काटोल परिसरात शालेय उपक्रमात तसेच सामाजिक चळवळीत त्यांचा सहभाग असतोच मात्र रक्तदानाविषयी असणारा गैरसमज व अंधश्रद्धा समाजातून नष्ट करण्याकरिता ते प्रयास करीत असतात.तसेच गरजूंना रक्त मिळण्याकरिता शेर शिवाजी युवा संघटनेचे संस्थापक सागर राऊत यांच्या माध्यमातून सहकार्य करीत असतात.
आयुष्यात ५० वेळा रक्तदान करण्याचा त्यांचा संकल्प आहे.त्यांनी केलेल्या रक्तदानातून बऱ्याच रुग्णाचे प्राण वाचलेले आहे.खऱ्या अर्थाने सामाजिक शिक्षण स्वतःच्या कृतीतून देण्याचा प्रयत्न करीत आहे.

बॉक्स प्रतिक्रिया

रक्तदान केल्यामुळे नवीन रक्त येते आणि आरोग्य सुदृढ राहते.गरजू व्यक्तींना रक्ताचा उपयोग होत असल्यामुळे मानसिक समाधान मिळते.तेव्हा सक्षम व्यक्तीने रक्तदान करणे काळाची आवश्यकता आहे.राजेंद्र रामहरी टेकाडे
काटोल जि.नागपूर