
राळेगांव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
एकवीस दिवस उलटले तरी मात्र नगर पंचायत राळेगांव नागरिकांना नळाद्वारे पिण्याचे पाणी देण्यात असमर्थ ठरत आहे.
विद्युत मोटारी जळाल्याने,वारंवार पाईपलाईन फूटणे,कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा,नगर पंचायत राळेगांव मधील अधिकाऱ्यांचे दुर्लक्षित धोरणामुळे गेल्या एकवीस दिवसा पासून शहरवासी पिण्याचे पाण्यापासून वंचित आहे.
दहा प्रभागात नळ येणे अंत्यत महत्वाचे आहे. कारण पिण्याचे पाण्याचे अन्य स्त्रोत नाही. आणि नागरिकांना नळाच्या पाण्याची सवय तीस ते चाळीस वर्षा पासून झाली आहे. पण आता इतर ठिकाणाचे पाणी पिल्याने घरोघरी आजारी व्यक्ती दिसत आहेत.
दोन विद्युत मोटारी जास्त आणून ठेवल्या तर काय हरकत आहे?.
कमी जास्त वीज दाबा मुळे ही समस्या वारंवार येते.या सोबत च निष्काळजीपणा हा देखील महत्वाचा घटक नळ योजना ठप्प करण्यात कारणीभूत आहे.
