बोकड चोरणारे आरोपी पोलीसांच्या जाळ्यात,मोटर सायकल सह तीन आरोपींना अटक

1

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

तालुक्यातील बेलोणा शेत शिवारात विवेक घनश्याम केवटे रा. कळंब यांचा गोटफार्म व पोल्ट्री फार्म असुन सदर गोटफार्म मधून ५ नोव्हेंबर २०२१ चे रात्री दोन वर्षे वयाच्या १२ हजार रुपये किंमत असलेला बोकड चोरीला गेला होता.प्राप्त माहिती नुसार बेलोणा शिवारातील विवेक घनश्याम केवटे यांचे गोट फार्म मधून चौकीदार झोपेत असताना ५ नोव्हेंबर चे रात्री चोरट्यांनी बोकड चोरुन नेला पोलीस अंमलदार विजय लोखंडे यांनी तपास चक्र फिरवली असता गुप्त माहिती दाराकडून माहिती काढून खात्री केली असता यातील आरोपी विशाल दशरथ वाटेकर वय १९ वर्ष रा. लासीना ( बाघापूर ) ता. यवतमाळ, ह. मु. अंकुश बगमारे बेलोणा यांचे शेतात, गजानन गणेश कासार ( २२ ) वर्ष रा. पाचोड, ता. आर्वी, जि. वर्धा, ह. मु. ज्योतीबाई किन्नाके रा. बेलोणा यांचे घरी, प्रविण मोहन किन्नाके (२६), रा. भारी, ता. यवतमाळ, यांनी गोटफार्म ची लोखंडी खिडकी तोडून आत प्रवेश करुन १२ हजार रुपये किंमतीचा बोकड चोरुन नेल्याचे निशपन्न झाल्याने आरोपींची कसुन चौकशी केली आरोपींना न्यायालयात हजर करुन ८ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडीची मागणी केली आहे.