घाटंजी तालुक्यातील शिवनी,पारवा,कुर्ली मंडळ अतिवृष्टीच्या यादीत समाविष्ट करा

8

अतिवृष्टीच्या मदत यादीत समाविष्ट करण्यात यावी वंचित बहुजन आघाडी यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

सततचा पाऊस व अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पिक पावसाने हिरावून गेले आहे.संततधार पावसामुळे आणि पुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकांची प्रचंड हानी झाली आहे.असे असतांना तालुक्याची आणेवारी ६२% जाहीर केली घाटंजी तालुक्यातील सात मंडळा पैकी शिवनी,पारवा व कुर्ली या मंडळातील गावे अतिवृष्टी च्या मदतीपासून वंचित ठेवण्यात आली आहेत हा भेदभाव शासन करत आहे. कुठल्याही शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष शेतात जाऊन सर्वे करण्यात आला नाही पाऊस किती पडला याची नोंद घेणारी यंत्र सातही मंडळात बसविण्यात यावी सध्या तालुक्यात चारच यंत्र आहेत याचाच फटका या मंडळाला बसला म्हणून वंचित बहुजन आघाडी घाटंजी चे तालुकाध्यक्ष संघपाल कांबळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देऊन तालुक्यातील परिस्थिती लक्षात आणून दिली व वगळण्यात आलेल्या कुर्ली, तरोडा, राजापेठ, ताडसावळी, सायफळ, चिखलवर्धा, गोविंदपूर , सायतखर्डा , रहाटी, पंगडी, झटाळा, दत्तापुर, नागेझरी, रायसा, कवठा,पारवा लिंगापूर , कीन्ही (वन), वाढोना, मेजदा, सोनखास, पिंपळखुटी, मुरडगव्हाण, गावारा, वघारा टाकळी, शरद, सावरगाव , भीमकुंड, मंगी, ठाणेगाव, होणेगाव, सावंगी संगम, सगदा, गनेरी, जाम्ब, कलेश्वर, माथनी, टिपेश्वर, खोरोनी बंदी, कोचीबंदी, राजेगाव बंदी, धूनकीबंदी, डोंगरगाव,शिवणी, मोहाडा, अंबाझरी, पोची, जरंग, सेवानगर, जरुर, राजूरवाडी, हिवरधरा या संपूर्ण गावांचा अतिवृष्टीच्या मदत यादीत समाविष्ट करण्यात यावा ही मागणी केली.दखल न घेतल्यास संपूर्ण शेतकऱ्यांच्या वतीने वंचित आघाडी तीव्र आंदोलन करण्यात येईल.याची जबाबदारी शासनाची राहील.
मुख्य मागण्या१) घाटंजी तालुक्यातील शिवनी,पारवा,कुर्ली मंडळ हि अतिवृष्टी च्या मदत यादीत समाविष्ट करण्यात यावी .
२) घाटंजी तालुका ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट रु. ५०,०००/- हेक्टरी नुकसान भरपाई देण्यात यावी . ३) पिकांची ६२% आणेवारी रद्द करून परिस्थिती निहाय वास्तव आणेवारी जाहीर करावी.या प्रसंगी जिल्हाध्यक्ष लक्मिकांत लोळगे,माजी जिल्हाध्यक्ष रणधीर खोब्रागडे व राजेंद्र तलवारे,जिल्हा महासचिव श्याम खंडारे, जिल्हा उपाध्यक्ष भानवे,दीक्षांत वासनिक,निखिल टिपले,ओंकार कळसकर,रमेश वाघमारे,गीता मेश्राम,लक्षमण देवतळे,रवी भोंगाडे,नितीन राठोड,तुकाराम कोरवते,सिताराम वाघ,राजू सोयाम,उमेश कुडमते,प्रेमानंद उमरे,सिद्धांत जीवने,पांडुरंग निकोडे,साहिल रामटेके,सुरज रामटेके,रा.वि.नगराळे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया :- कुठल्याही शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष शेतात जाऊन सर्वे करण्यात आला नाही पाऊस किती पडला याची नोंद घेणारी यंत्र सातही मंडळात बसविण्यात यावी सध्या तालुक्यात चारच यंत्र आहेत याचाच फटका या मंडळातील शेतकऱ्याला बसला संघपाल कांबळे तालुकाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी घाटंजी