खरीप हंगामात बियाणे खरेदी करताना काळजी घ्यावी… तालुका कृषी अधिकारी राळेगाव कु. एम. बी. गवळी यांचे शेतकरी बांधवांना आवाहन

….
राळेगांव तालुका प्रतिनिधी :- रामभाऊ भोयर (9529256225)

खरीप हंगाम तोंडावर आल्याने शेतकऱ्यांची बियाणे खते खरेदीची लगबग सुरू झाली आहे मागील वर्षी खरीप हंगामात झालेल्या सोयाबीन बियाणे उगवन तक्रारींच्या  अनुषंगाने या वर्षी खरीप हंगामात बियाणे/खते खरेदी करताना शेतकरी बांधवांनी दक्षता घ्यावी असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले असून सोबतच कोणताही कृषी केंद्र धारक निविष्ठे सोबत अनावश्यक निविष्ठा खरेदी करण्यास भाग पाडत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे निर्देश देखील यावेळी देण्यात आले आहे.
शेतकरी बांधवांनी बियाणे /खते अधिकृत विक्रेत्यांकडून खरेदी करावे व विक्रेत्यांकडून पक्की पावती घ्यावी पावतीवर पिक,वान, संपूर्ण लॉट क्रमांक, बियाणे कंपनीचे नाव,किंमत,रोख किंवा उधार पावती इत्यादी संपूर्ण तपशील असल्याची खात्री करूनच पावती घ्यावी खरेदी केलेल्या बियाणे /खताचे वेष्टन पिशवी व पक्की पावती तसेच त्यातील थोडे बियाणे पिकाची काढणी होईपर्यंत जपून ठेवावे खते बियाणे खरेदी करताना बॅग सीलबंद असल्याची व अंतिम मुदत तसेच एमआरपी किंमत तपासूनच घ्यावी

सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की खरीप हंगामात बियाणे खते खरेदी करताना बियाणे किंवा खताच्या बॅगेवर नमूद असलेल्या किमतीपेक्षा जास्त दराने विक्री होत असल्यास, बॅगेवर नमूद केलेल्या वजनापेक्षा कमी निविष्ठा आढळून आल्यास किंवा निविष्ठा खरेदी करताना जर कृषी सेवा केंद्र संचालक एका निविष्टेसोबत दुसरी निविष्ठा अनावश्यक पणे खरेदी करण्यास भाग पाडत असल्यास आपण त्वरित कृषी विभाग,पंचायत समिती किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांकडे तक्रार दाखल करावी.