बेंबळा प्रकल्प अधिकारी यांनी पुसली शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी

महसूल व कृषी विभाग यांच्या पंचनाम्याला दाखवली केराची टोपली

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

  

राळेगाव तालुक्यातील खडकी येथील शेतकरी देविदास आडकुजी तेलतुंबडे शेत सर्वे नंबर ५४/२ या शेतकऱ्यांच्या शेतात १५ नोव्हेंबर २०२१ रोजी बेंबळा कँनलचे पाणी शिरल्याने तीन एकर चना पिकांचे मोठे नुकसान झाले होते. राळेगाव तहसीलदार डॉ. रवींद्र कानडजे यांनी संबंधित मंडळ अधिकारी व तलाठी यांना आदेश देऊन नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात जावून मोक्का पाहणी करून अहवाल सादर करावा असे आदेश राळेगाव तहसीलदार यांनी दिले होते या आदेशाचे पालन करत संबंधित मंडळ अधिकारी, तलाठी व कृषी सहायक यांनी तेलतुंबडे यांच्या शेताची मोक्का पाहणी करून अहवाल तयार केला या अहवालात असे नमूद केले होते. उपरोक्त दर्शविण्याप्रमाणे गट क्र. ५४/२ मध्ये अदांजे एक हेक्टर क्षेत्रा मध्ये बेंबळा कालव्याचे पाणि साचलेले असुन सदर शेतात हरभरा पिक होते. पिक पुर्णपणे पाण्याखाली गेलेले असुन अंदाजे एक लाख रुपयाचे नुकसान या शेतकऱ्यांचे झाले आहे सदर पंचनामा खाली सह्या करणारे पंच, मंडळ अधिकारी, तलाठी खडकी व कृषी सहायक यांच्या समक्ष पंचनामा करण्यात आला आहे असे १६/११/२०२१ च्या अहवालात मंडळ अधिकारी तलाठी व कृषी सहायक यांनी पंचनामा करून खालील सह्या मारुन महसुल विभाग व बेंबळा प्रकल्प यांचाकडे पाठविण्यात आला होता. परंतु एक महीना लोटुन गेला होता तरिसुद्धा बेंबळा प्रकल्पाचा एकही अधिकारी माझ्या शेतात मोक्का पाहाणी साठी आला नसल्याने परत मला १६/१२/२०२१ ला बेंबळा प्रकल्पाला स्मरणपत्र सादर करावे लागले होते. सदर स्मरण पत्रात मि असे नमुद केले होते कि १६/११/२०२१ रोजी अर्जाद्वारे कळविले होते कि सदर माझ्या शेतातील नुकसानीचा पंचनामा तहसीलदार राळेगाव यानी तलाठी खडकी यांच्या मार्फत माझ्या शेतातील झालेल्या नुकसणीचा पंचनामा करण्यात आलेला होता करीता या स्मरणपत्रा द्वारे पुनच्छ आपणास नुकसान भरपाई देण्याची विनंती करित आहे सोबतच पंचनाम्याची छायांकीत प्रत जोडीत आहे असे मी १३/१२/२०२१ ला स्मरणपत्र बेंबळा कालवे उपविभाग राळेगाव यांच्याकडे सादर केले होते. याही पत्राची दखल न झाल्याने मी परत आपले सरकार पोर्टलवरील दिनांक २८/०२/२०२२ ला तक्रार दाखल केली होती या तक्रारीची दखल घेत दिनांक ०४/०३/२०२२ ला मला न बोलावता माझ्या शेताची मोक्का पाहणी करण्यात आली असुन शेतात हरभर्‍याचे पिक सुस्थीतीत असुन पिकाचे नुकसान झाल्याचे आढळून आले नाही असा खोटा अहवाल आपल्या अधिकाऱ्यांना पाठवुन मला नुकसाण मिळण्यापासुन बेंबळा कालव्याचे साहाय्यक अभिंयता पिंगळे श्रेणी-१ राळेगाव व राठोड यांनी वंचीत ठेवले आहे. असे मत शेतकरी देविदास अडकुजी तेलतुंबडे यांनी व्यक्त केले आहे. ________________________
प्रतिक्रिया बेंबळा प्रकल्प अधिकारी यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे माझ्या शेतात बेंबळा कालव्याचे पाणी शिरूर माझ्या शेतातील तीन एकर चंना जमिनदोस्त झाला आहे. मला नुकसान भरपाई न मिळाल्यास मी उपोषणाला बसणार शेतकरी
देविदास तेलतुंबडे खडकी