प्रहार जनशक्ती पक्षाच्या जिल्हाउपाध्यक्ष पदी संजयभाऊ दूरबुडे यांची निवड

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

प्रहार जनशक्ती पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदावर राळेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संजयभाऊ दूरबुडे यांची निवड झाली. संस्थापक अध्यक्ष नामदार बचूभाऊ कडू यांनी ही मोठी जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. कार्याध्यक्ष महेंद्र उर्फ बल्लूभाऊ जवणजाळ यांच्या स्वाक्षरीचे नियुक्ती पत्र त्यांना नुकतेच देण्यात आले.
संजयभाऊ दूरबुडे हे प्रहार जनशक्ती पक्षात कार्यरत आहे. सोबतच विविध सामाजिक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामं केले. बचूभाऊ कडू यांची विचारधारा व जनसामान्यांची सेवा करून जिल्ह्यात प्रहार जनशक्ती पक्षाचे मजबूत संघटन उभे करू अशी भावना त्यांनी नियुक्ती नंतर वेक्त केली. प्रहार जनशक्ती पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांचे आभार मानले.