
. राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर :-
दवाखाना म्हटलं कि प्रत्येकाच्य अंगावर काटे उभारतात,त्यातही सरकारी दवाखान्यात फार कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागते अशातच या कोरोना नावाच्या आजाराने सगळीकडे हाहाकार माजला असून अशा वेळी ज्याच्यावर प्रसंग उद्भवतो त्याची खैर नाही.अशावेळी आपलं घरदार सोडून सकाळपासुन संध्याकाळपंर्यत शासकिय रुग्णालयात लोकांच्या सेवेत लागून असलेल्याची गोष्टच वेगळी.अशातच माझ्यावर आलेल्या अनेक कठीण प्रसंगाच्या वेळी मला अचानक माहीत झालेलं नाव म्हणजे रितेश भरूट. अनेक वेळा आपल्या परिसरातील, गावातील लोकं दवाखान्यात गेल्यानंतर आपण रितेशभाऊला 9922131888 या नंबरवर फोन करून त्यांच्या वाट्सपवर रूग्णाची माहीती पाठविली कि भाऊ कुठलिही ,कुणाच्याही शिफारशीची अपेक्षा न करता त्या रूग्णाजवळ पोहचून डांक्टरशी चर्चा करून पेशंटची व्यवस्था करतात व पेशंटला दिलासा देतात. अशाप्रकारे यवतमाळ जिल्ह्यातील कुठलाही पेशंट असो,जे काम लोकप्रतिनिधीनी करावं ते काम रितेशभाऊ करतात. सध्या यवतमाळ जिल्हा रूग्णालयात सर्वत्र रितेश भाऊ यांचे नाव घेतले जात असून साधा पेशंट असो कि कोरोना पांझिटिव्ह असो ते सदैव तयार राहून त्या रूग्नाची व्यवस्था करण्यात लागून असतात. कुठल्याही प्रकारच्या पदाची अपेक्षा न करणारे रितेश भरूट हे सामान्य लोकासाठी देवदूतच म्हटले तरी वावगे ठरणार नाही अशातच त्याना कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्याची मागणी राळेगाव खरेदी विक्री संघाचे संचालक श्रावणसिंग वडते सर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्धारे म्हटले आहे.
