


राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस च्या निर्देशानुसार माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालय राळेगाव समोर येथे तालुका काँग्रेस च्या वतीने शहर काॅग्रेस च्या वतीने पेट्रोल, डिझेल, एलपिजी गॅस, खाद्यतेलासह अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत वारेमाप दरवाढ करून गोरगरीब, सर्वसामान्य जनतेची लूटमार करणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारच्या महागाई विरोधात, बेरोजगारी व सैन्य भरतीच्या तरुणांना नुकसानकारक ठरणाऱ्या अग्नीपथ योजनेच्या विरोधात तसेच जीवनावश्यक वस्तूवरील वाढवलेल्या जी. एस. टी च्या विरोधात एकदिवसीय धरणे आणि जेलभरो आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने महागाई कमी करावी, अग्नीपथ योजना मागे घ्यावी, गोरगरीब जनतेला दिलासा देण्यात यावा या प्रसंगी काँग्रेसच्या वतीने तहसील समोर रास्ता रोको करून जेलभरो आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा करण्यात आल्या. माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके सह काँग्रेस च्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अटक करून घेतली. या आंदोलनात स्थानिक महिला, युवकांनी हजारोंच्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग घेतला यावेळी यवतमाळ जिल्हा काॅग्रेस अध्यक्ष प्रफुल मानकर,ओं. बि. सी .जिल्हा अध्यक्ष अरविंद वाढोणकर,.राळेगाव तालुका काॅग्रेस अध्यक्ष अरविंद फुटाणे, राळेगाव शहर अध्यक्ष प्रदिप ठुणे,राळेगाव नगराध्यक्ष रविंद्र शेराम,उपाध्यक्ष जानराव गिरी,प्रविण कोकाटे,सुधिर जवादे,मनीष पाटिल,संजय ठाकरे,प्रविण देशमुख,शामकांन्त येणोरकर,अशोक काचोळे, आषीश पारधी, किरण कुभरे,अंकुश मुनेश्वर, यवतमाळ महिला जिल्हा अध्यक्षा अंवारी , किशोर धामंदे,महादेव तुरणकर, अजय पिंपरे,भगीरथ झाडे,किशोर धामंदे,पंकज गावंडे,आषीश पारधी, राजू ठाकरे,गजानन राऊत,किशोर हीवरकर,बंडुजी गेडेकार,अंतुजी राऊत,संजय ठमके ,प्रफुल वटाणे ,प्रविण येबंडवार,मोहन नरडवार,विनायकराव बरडे,अभय पुडके,दीनेश वैरागडे,केशवराव पडोळे,अशोकराव काचोळे,प्रफुल तायवाडे,नितीन खडसे,राजु तिवाडे,विनोदराव जयपुरकर,संजय कारवडकर,महादेव तुरणकर, लक्षमण घडले, गणेश बुरले भानुदास राऊत ,सुरेश वर्मा,अंकुश रोहनकर,ततेश्वर पिसे,प्रा अशोक पिंपरे,दिलीप दुधगिकर, कुंदन कांबळे ,कमलेश गेहलोत,निश्चल बोभाटे,पुरुषोत्तम चिडे,गजानन पाल, गजू महाजन, अफसर सैय्यद ,जया रागेनवार ,रामू भोयर ,राहूल होले,शशांक केंढे,राजू पूडके व अनेक काँग्रेस चे कार्यकर्ते हजर होते तसेच ग्रामीण भागातील जनता यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह केंद्र सरकारचा निषेध करून जेलभरो आंदोलन करण्यात आले.
