आदर्श दुर्गोत्सव मंडळ येथे लसीकरण शिबिर संपन्न,१०७ लोकांनी घेतला लसीकरणाचा लाभ

🔹सामाजिक उपक्रमाचे यशस्वी २६ वर्षे

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

    

आदर्श दुर्गोत्सव मंडळ राळेगाव द्वारे नवरात्र उत्सवादरम्यान आयोजीत कोरोना लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण १०७ लोकांनी लसीकरण करून घेतले विशेष म्हणजे यामध्ये ७३ लोकांनी प्रथम डोज घेतला.
यावेळी शिबिराला तहसीलदार डॉ. रवींद्र कानडजे, पोलीस निरीक्षक संजय चोबे, गट विकास अधिकारी रविकांत पवार, तालुका आरोग्य अधिकारी गोपाळ पाटील, नगर पंचायत चे राहुल मरकड यांनी भेट दिली देऊन आदर्श मंडळाच्या सर्व सदस्यांचे कौतुक केले.
आदर्श मंडळाने यापूर्वी सुध्दा असे सामाजिक उपक्रम ज्यामध्ये रक्तदान शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रबोधनकार भास्कर पेरे पाटील, रमेश ठाकरे यांचा प्रभोधनपर कार्यक्रम, रांगोळी स्पर्धा असे विविध सामाजिक उपक्रम राबविले आहे, विशेष म्हणजे या मंडळामध्ये लाखाणी परिवार हे खोजा समाजाचे असून हिंदू धर्मातील स्त्रीचं महात्म्य विषद करणाऱ्या नवरात्र उत्सव २६ वर्षांपासून पिढ्यांनपिढ्या दरवर्षी नित्यनेमाने साजरा करून सर्व जाती धर्मामध्ये सलोखा, एकोपा अबाधित रहावा याकरीता लाखाणी परिवार सर्व जाती धर्माचे सण उत्सवामध्ये हिररीने भाग घेऊन सण उत्सव साजरा करतात.
लसीकरण शिबीर यशस्वी करण्यासाठी मंडळाचे शशीमोहन लढी, संदीप झाडे, संदीप बेडदेवार, समीर लाखाणी, अमोल पंडीत, उमेश कोसुळकार, संजय राऊत, संजय शिखरे, रितेश चिटमलवार, मनोज भोयर, दिलीप लांभाडे, रऊप, वैभव बोभाटे, अनिल राऊत, अंकीत बोटरे, साहिल लाखाणी, ओम कोसुळकार, ओम बेडदेवार, जगदीश राऊत, गिरी सह आरोग्य विभागाच्या पुजा मोहूर्ले, सुनीता चेलमेलवार, माया अवघडे, सिस्टर एन. पी. चौधरी, pta इंदिरा ठमके, डाटा ऑपरेर प्रवीण मेंढे यांनी परिश्रम घेतले.