
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव येथील राजीव गांधी क्रीडा संकुल येथे नवोदय क्रीडा मंडळाच्या मैदानावर सराव करणारे सागर गुप्ता व तृषार किरपाल या दोन खेळाडूंची भारतीय हँडबॉल संघात निवड झाली आहे हे दोन्हीं खेळाडू भारतीय हाँडबॉल संघाचे नेतृत्व करणार आहे . नेपाल येथील पोखरा येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय हाँडबॉल स्पर्धा 27 एप्रिल पासुन सुरू होणार आहे या स्पर्धेत भारतीय हाँडबॉल संघात राळेगाव येथील ग्रामीण भागातली दोन खेळाडू यांची निवड झाल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. राळेगाव येथे सर्वात आदी पत्रकार संघटनेचे माजी अध्यक्ष तथा माजी प्राचार्य अशोकराव पिंपरे सर यांनी हाँडबॉल खेळाचे मैदान सुरू केले व मुलांना प्रशिक्षण दीले त्यामुळे आज राळेगाव सारख्या ग्रामीण भागातली दोन खेळाडू यांची भारतीय हाँडबॉल संघात निवड झाली आहे असे खेळाडू यांनी सांगितले आहे.
