
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
आज दिनांक 22 सप्टेंबर 2021 रोजी रालेगाव तालुक्यातील खैरगाव कासार येथे रात्री 9 वाजताच्या दरम्यान नीलेश दुधकोहले यांच्या घराजवळ अजगर जातीचा सर्प आढळून आला,ही बाब माहिती होताच गावातील वैभव वेट्टी नवाब यांनी सर्प निघाल्याची माहिती सर्प मित्रांना दिली,सर्प मित्रांनी लगेच खैरगाव कासार गाठून अजगर सापाला शिताफीने ताब्यात घेतले ह्यावेळी सर्प मित्र- प्रफुल सहारे , आदित्य शाहू , अजय जाधव , यानी त्या अजगर सापाला ला पकडले या वेळी गावातील वैभव वेट्टी नवाब , निवास पालेकर , धनराज काटकर, कवंडू ठाकरे, देवींद्र सहागवरे व आधी गावकरी उपस्थित होते.
