
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यातील रिधोरा
येथे ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित ८६५ या सोसायटीच्या अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया गोपनीय पद्धतीने घेण्यात आली. सविस्तर वृत्त असे. रिधोरा येथे प.स.माजी सभापती प्रविण कोकाटे,हरिष काळे, दिपक पवार या तीनही गटामध्ये समन्वय साधून माजी शिक्षणमंत्री वसंतराव पुरके व यवतमाळ जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रफुल्ल मानकर यांनी तीनही गटांना एकत्र करून ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था रजिस्टर नंबर ८६५ सोसायटी रिधोरा यांची अविरोध निवडणूक प्रक्रिया पूर्ण करून दिली होती यात कोकाटे गटाला ९ तर काळे व पवार गटाला ४ उमेदवार देऊन रिधोरा सोसायटीची अविरोध निवड करण्यात आली होती परंतु कोकाटे गटामध्ये अध्यक्ष पदासाठी तुतु मय मय झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी कैलास खटारे (ए.आर.) यांनी गोपनीय पद्धतीने निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश सचिव काळे यांना दिले होते सदर अध्यक्ष पदासाठी ३ अर्ज दाखल झाले होते तर उपाध्यक्ष पदासाठी १ अर्ज दाखल झाला होता. अध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल दिपक पवार,विष्णु महाजन, बाबाराव गौऊळकार तर उपाध्यक्ष पदासाठी अर्ज शरद सातघरे यांनी दाखल केला होता. सदर दिपक पवार यांनी अध्यक्ष पदासाठी भरलेला अर्ज मागे घेतल्याने एकाच गटात म्हणजे कोकाटे गटात चांगलीच तुतु मय मय झाली होती.सदर या गोपनीय पद्धतीने अध्यक्ष पदासाठी निवडणूकीत कोकाटे गटाचेच दोन उमेदवार असल्याने विष्णु विठ्ठलराव महाजन यांना ८ मते मिळाली तर बाबाराव गौऊळकार यांना ५ मते मिळाली सदर विष्णु महाजन यांना ८ मते मिळाली असल्याने त्यांना अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले तर उपाध्यक्ष म्हणून शरद सातघरे यांची अविरोध निवड करण्यात आली आहे.सदर निवडणूक अधिकारी म्हणून कैलास गटारे, सचिव काळे,. यांनी काम केले तर सोसायटी संचालक, सरपंच, सचिव कर्मचारी उपस्थित होते.
