राळेगांव तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने वृक्षारोपण


राळेगांव तालुका प्रतिनिधी :- रामभाऊ भोयर (9529256225)


सामाजिक बांधिलकी जोपासत राळेगाव तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने दिं २२ जून २०२१ रोज मंगळवार ला वृक्षारोपण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन राळेगाव तालुका पत्रकार संघटना व सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
हे वृक्षरोपन एच पी जिनिंग समोरील वनीकरण विभागाच्या खाली जागेत करण्यात आले असून यावेळी पी एल शिरसाट प्रणित ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष ओंकारभाऊ चेके, सचिनभाऊ चौधरी, पवनभाऊ धोत्रे,तसेच सामाजिक वनीकरण विभागाचे संजयराव केराम,मिलिंदराव राठोड, नामदेवराव अक्कलवार,दिपकराव पाटील, राळेगाव तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष प्रा. अशोकभाऊ पिंपरे ज्येष्ठ पत्रकार प्रकाशजी मेहता, डॉ.के एस वर्मा साहेब, महेशभाऊ शेंडे, प्रा. मोहनजी देशमुख, राजेशजी काळे, मंगेशभाऊ राऊत,राष्ट्रपालजी भोंगाडे, फिरोजभाऊ लाखांनी, महेशजी भोयर, संजयभाऊ दूरबुडे,प्रमोदभाऊ गवारकर, दिपकराव पवार, मंगेशजी चवरडोल, अजीजभाई शेख, दिनेशजी सराटे, सचिनजी राडे, शालीकजी पाल, श्रीकांतजी कवाडे, विनोदराव चिरडे, रणजितजी परचाके, गुड्डूजी मेहता, राजूभाऊ काळे,रितेश भोंगाडे, शंकरराव जोगी,जावेदभाई पठाण,आदी उपस्थित यावेळी राळेगांव पत्रकार संघटनेची सभा घेण्यात आली होती या सभेत पुढील काळात सामाजिक उपक्रम राबविणे व पत्रकारांचे संघटन मजबूत करणे पत्रकारावर होणाऱ्या अन्यायाचा पत्रिकार करणे यासह अनेक बाबींवर चर्चा करण्यात आली.