म.रा.विद्युत वितरण कंपनी वडकी सबस्टेशन व ग्रामपंचायत कीन्ही जवादे चे विद्यमाने आयोजित

कृषीपंप धारक शेतकऱ्यांना विजबीलात सवलत बाबतीत मार्गदर्शन.

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

ग्रामपंचायत कीन्ही जवादे येथे आयोजित कृषी पंप धारक शेतकऱ्यांची सभा घेण्यात आली.म, रा.विध्युत वितरण कंपनी वडकी व ग्रामपंचायत कीन्ही जवादे यांच्या वतीने परीसरातील शेतकऱ्यांना क्रुषी पंपाच्या विजबीला संदर्भात असलेल्या योजनांची माहिती देण्यात आली.३१ मार्च २०२२च्या आत शेतीपंपाचे विजबील भरल्यास मोठी सवलत देण्यात येणार आहे, त्याकरिता संपर्क साधावा असे आवाहन, संबंधित यंत्रणेकडून , इंजिनिअर गीरी, इंजिनिअर वनकर, कर्मचारी मेश्राम यांनी केले.यावेळी सरपंच सुधीर जवादे,व अनेक शेतकरी हजर होते.