रेती तस्करी विरोधात वडकी पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी,कर्तव्यदक्ष ठाणेदार विनायक जाधव यांची रेती तस्करविरोधात मोहीम

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव तालुक्यातील वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेले येवती धानोरा रोड येथे चालू असलेल्या अवैध रेती तस्करी विरोधात वडकी पोलीस स्टेशन ठाणेदार श्री विनायक जाधव यांच्या नेतृत्वात आज रोजी हिरव्या रंगाचा ट्रॅक्टर क्र MH 29 BC 2195 व ट्रॉली क्र MH 29 V 6078 किंमत अंदाजे 500000/- व त्या मध्ये एक ब्रास रेती किंमत 5000/- असा एकूण 5,05000अशी रेती वाहतूक करताना अवैध रित्या घेवून जात असल्याने पकडला त्यामध्ये ट्रॅक्टर चालक शुभम बंडूजी बावणे व मालक संजय निळकंठ कुबडे दोघेही राहणार येवती यांच्यावर कारवाही करण्यात येत आहे अशी माहिती मिळाली आहे राळेगाव तालुक्यात खुप मोठ्या प्रमाणात अवैध रेती तस्करी चालू असून खुप मातब्बर व्यवसाय करतात पण त्यांना आळा घालण्याचे काम वडकी पो स्टे करीत असल्याचे दिसून येत आहे वरील कारवाई करताना वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनायक जाधव व चालक अडपावर व आकाश कुदूसे पोलीस यांची खुप मोठी कामगिरी आहे खरंच पाहता वडकी पोलीस स्टेशन गेल्या कित्येक दिवसांपासून हायवेवर असल्याने आवैध जनावर तस्करी, रेती तस्करी यांच्यावर आळा घालण्यास तत्पर दिसून येत आहे त्यांची सर्व स्तरावरून वाहवा करण्यात येत आहे.