राळेगाव तालुका तिरळे कुणबी संघटनेची येवती येथे बैठक संपन्न

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

दि ३-१२-२१ रोजी राळेगाव तालुका तिरळे कुणबी समाज संघटनेची बैठक येवती येथील सोनामाता देवस्थान येथे पार पडली,राळेगाव तालुका तिरळे कुणबी संघटनेचे अध्यक्ष मा.श्री.हेमंतभाऊ ठाकरे यांनी प्रास्ताविक केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री.सुधीरभाऊ जवादे यांनी समाजबांधवांना मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे मा.डॉ.अशोकराव फुटाणे,मा.रामुभाऊ भोयर, राळेगाव तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत करंजी(सो) सरपंच प्रसादभाऊ ठाकरे उपस्थित होते.
या वेळी येवती तिरळे कुणबी समाज संघटनेच्या अध्यक्षपदी मा.श्री.भैयाजी शामरावजी पोहदरे यांची तर उपाध्यक्ष पदी मा.विजयराव सदाशिवराव चौधरी,कोषाध्यक्ष पदी मा.वासुदेव पुरुषोत्तमराव वानखेडे,सचिव पदी मा.अनिकेत श्रीकांतराव टापरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी पंढरीराव पारधी,पंकजभाऊ गावंडे,रामभाऊ कुरटकार,मधुकरराव बोबडे,विजयराव चौधरी,तेजस ठाकरे अनेक तिरळे कुणबी समाज कार्यकर्ते उपस्थित होते.