
ग्रामरोजगार सेवकांची निवेदनाद्वारे मागणी न्याय मिळाला नाही तर रोजगार सेवक बसणार उपोषणाला
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
महाराष्ट्रातील ग्राम पंचायत ग्रामरोजगार सेवकांची संख्या २८,१४४ एवढी असून राज्य सरकारने महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत ग्रामपंचायत ग्रामसभेतून ग्रामरोजगार सेवकांची ग्रामसभेद्वारे नियुक्ती करण्याचे आदेश दिले त्यानुसार सन २००६ पासुन आजतगायत राज्यात एकूण २८,१४४ रोजगार सेवक शासनाच्या प्रशासकीय खर्चाच्या निधीतून ६% मानधनावर कार्यरत असून सन २००६ पासून गेल्या १५ (पंधरा) वर्षांपासून ग्रामपंचायत स्थरावर ग्रामपंचायत पॅनल च्या माध्यमातून नवीन ग्राम पंचायत सदस्य व सरपंच यांची निवड होते.पण राज्यामध्ये बऱ्याच ग्रामपंचायतमध्ये सत्तांतर झाल्यावर सूडबुद्धीने ग्रामरोजगार सेवकांना कामावरून कमी करून जाणीवपूर्वक अन्याय केला जातो त्यामुळे ही बाब अत्यंत गंभीर असून त्यामुळे ग्रामरोजगार सेवकांना त्रास होऊन निर्णयाला सामोरे जावे लागते व त्यांच्या कुटुंबाची पालनपोषणाची जबाबदारी कुटुंब प्रमुख म्हणून रोजगार सेवकांवर असल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येते व त्याच्यावर अन्याय होतो
वरील गंभीर बाबाची दखल घेऊन ग्रामरोजगार सेवकांना ग्रामपंचायत स्तरावर कायम करण्याचा निर्णय घेऊन राज्यातील सर्व ग्राम रोजगार सेवकांना ग्रामपंचायत सेवेत कायम करून न्याय द्यावा नी नम्र विनंती अन्यथा दिनांक:- ०२/१०/२०२१ रोजी महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्रातील सर्व तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येईल असे निवेदन मा.तहसीलदार राळेगाव, मा.गटविकास अधिकारी पं. स.राळेगाव,यांच्या मार्फत मा.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, रोहयो मंत्री,यांना देण्यात आले अशी माहिती राळेगाव तालुका रोजगार सेवक संघटनेचे अध्यक्ष मयुर जुमळे यांनी दिली. निवेदन देते वेळी राळेगाव तालुक्यातील सर्व रोजगार सेवक उपस्थित होते.
