
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
उत्तरप्रदेशातील लखीमपुर खीरी येथे शेतकरी आंदोलनाला दहशतीने चिरडून टाकणाऱ्या केंद्र सरकारच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून पुकारलेल्या बंदला राळेगाव येथील व्यापाऱ्यांनी संमिश्र असा प्रतिसाद देत आपली प्रतिष्ठाने काही प्रमाणात स्वयंस्फूर्तीने बंद ठेवत पाठिंबा दिला. न्याय मागणाऱ्या शेतकऱ्यांना भाजपाच्या योगी सरकार कडून व केंद्रीय मंत्र्यांच्या मुलांकडून चिरडून टाकल्याच्या घटनेचां संपूर्ण देशभरात सर्व स्तरातून निषेध करण्यात येत आहे. भाजप सरकारचे हे कृत्य हिटलर व मुसोलिनीलाही लाजवेल अशा प्रकारचे आहे. शेतकर्यांचा सामुहिक नरसंहार करणाऱ्या भाजप सरकार विरोधात संपूर्ण देशभर आंदोलने सुरू आहे.
राळेगाव शहरात सकाळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बंद साठी व्यापाऱ्यांना आग्रह न धरता यवतमाळ चौफुली येथे जवळपास एक तास रास्ता रोको आंदोलन करून लखीमपूर येथील घटनेचा तीव्र निषेध नोंदविला.
