
बेंबळा कॅनलचे केले नुकसान
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव शहराला लागून असलेल्या मौजा बोराखडी सर्वे नंबर २२/१ मध्ये माऊली पार्क या नावाने ले आऊट पाडण्यात आले आहे व त्याठिकाणी राहण्याजोगी कोणत्याही प्रकारची व्यवस्था नसतांना महसूल अधिकारी यांनी अकृषक प्लॉट विक्रीची परवानगी कशी दिली असा प्रश्न निर्माण झाला आहे. याठिकाणी अनेक सामान्य लोकांनी हप्तेवारीवर प्लॉट घेतले आहे परंतु त्याठिकाणी राहण्याजोगी व अकृषक प्लॉट साठी जे नियम आहे ते ले आऊट मालक यांच्याकडून पुर्ण करण्यात आले नाही तरीहि ले आऊट मधील प्लॉट विक्रीची परवानगी महसूल अधिकारी यांनी कशी दिली असा प्रश्न आता ले आऊट मध्ये प्लॉट खरेदी केलेला लोकांना पडला आहे. राळेगाव शहरात माऊली पार्क या नावाने चार ले आऊट आहे व या चार ले आऊट साठी विद्युत पुरवठा करण्यासाठी एकच विद्युत डिपी असल्याचे सांगण्यात येत आहे परंतु नियमानुसार प्रत्येक ले आऊटला वेगवेगळी विद्युत पुरवठा डीपी पाहिजे परंतु तसे माऊली पार्क या ले आऊट मध्ये दिसुन येत नाही तरीहि प्लॉट विक्रीची परवानगी कशी दिली असा प्रश्न निर्माण झाला आहे. माऊली पार्क ले आऊट मधुन बेंबळा कॅनल गेला आहे त्या कॅनल चे नुकसान ले आऊट मालक यांनी केले आहे त्यामुळे समोरच्या शेतकऱ्यांना कॅनलच्या पाण्याचा फायदा होत नाही. तरीहि ले आऊट मालकावर कार्यवाही न करता प्लॉट विक्रीची परवानगी महसूल अधिकारी यांनी दिली हे कितपत योग्य आहे असा प्रश्न पडतो. राळेगाव शहरात अनेक ले आऊट आहे परंतु एकाच विद्युत डीपी वर चार ले आऊट ला परवानगी मिळणारे एकमेव ले आऊट हे माऊली पार्क हे असल्याचे समजते लोकांना आदी ले आऊट मालकाकडून अनेक आश्र्वासन दिले जाते परंतु तसे होत नाहीं परंतु प्लॉट विक्रीची परवानगी देताना तरी महसूल अधिकारी यांनी ले आऊटची पाहणी करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. माऊली पार्क ले आऊटची प्लॉट विक्रीची परवानगी रद्द करून राहण्याजोगी व्यवस्था झाल्यावर प्लॉट विक्रीची परवानगी देण्यात यावी तो पर्यंत विक्री थांबवावी अशी मागणी प्लॉट खरेदी केलेल्या ग्राहकाकडून होत आहे त्यामुळे राळेगाव येथील तहसिलदार यांनी ले आऊटची पाहणी करून माऊली पार्क ले आऊट मधील प्लॉट विक्रीची परवानगी रद्द करावी अशी मागणी होत आहे.
माऊली पार्क ले आऊट ची तक्रार प्राप्त होताच ले आऊट मालकाला नोटीस बजावण्यात येईल व कार्यवाही करून प्लॉट विक्रीची परवानगी रद्द करण्यात येईल
-डॉ. रविंद्रकुमार कानडजे
तहसीलदार राळेगाव
