
राळेगाव:-जनकल्याण फाउंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे जनकल्याण फाउंडेशन चे प्रदेश अध्यक्ष तथा जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते पियुष रेवतकर यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रातील अभ्यासू मुलांना निशुल्क पुस्तके वाटप करण्यात येत आहे .आज शहरातील 10 अभ्यासू मुलांना निशुल्क पुस्तके देण्यात आली.छत्रपती शिवाजी महाराज ,बाबासाहेब आंबेडकर ,ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित पुस्तकांचा यात समावेश आहे .’पुस्तक वाचाल तरच वाचाल’ या उपक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करण्यात येत आहे .यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथील विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करून या उपक्रमाला सुरवात करण्यात आली .जनकल्याण फाउंडेशन चे प्रदेश अध्यक्ष पियुष रेवतकर यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यात व तालुक्यात यशस्वी पणे राबविण्यात येत आहे.
