राळेगावात चोरट्यांचा धुमाकूळ

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव शहरात काल रात्रीचोरट्यांनी चार दुकानाचे कुलूप तोडून रोख रक्कम प्रसार केली,त्यात राजश्री ऑटो वर्ड प्रायव्हेट लिमिटेड होंडा शोरूम राळेगाव येथील दुकान शूटरचे लॉक तोडून सीडी 110 ड्रीम डीलक्स ही बाईक किंमत अंदाजे 65000 चोरट्यांनी लंपास केली तर यावरच न थांबता लॉर्ड्स बार राळेगाव येथील शटरचे लॉक तोडून गल्ल्यातील अठराशे रुपये नगदी स्वरूपात चोरून नेले व भारत इलेक्ट्रिकल यांच्या सुद्धा दुकानचे लॉक तोडून गल्ल्यातील नऊशे रुपये नगदी स्वरूपात चोरट्यांनी चोरून नेले तसेच विश्वकर्मा एग्रो एजन्सी राळेगाव येथील सुद्धा चारशे रुपये रोख चोरट्याने लंपास केले, असा एकूण 67 हजार 900 रुपये चोरट्यांनी चोरून नेले या स्वरूपाची श्री पंकज प्रकाशराव शहाकार यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध राळेगाव पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला 457,380 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.