

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
ढाणकी गांजेगाव ते सिंदगी रस्त्याचे काम जलद गतीने सुरू करावे या मागणीसाठी वंचीत बहुजन आघाडीच्या कार्यकत्र्यांनी 17 जुन 2022 रोजी गांजेगाव येथिल पैनगंगा नदीपात्रात उतरून जलसमाधी आंदोलन केले.आंदोलन कत्र्यांना पोलीसांनी अटक करून स्थानबध केले.
मागील 2 महिन्यापासून ढाणकी,गांजेगाव,सिंदगी रस्त्याचे प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत रस्त्याचे रूंदिकरण व मजबूतीकरणाचे काम सुरू आहे.मात्र अतिशय संथ गतीने सुरू असलेल्या कामा बद्दल परिसरातील नागरीकात तिव्र नाराजी आहे.वंचीत बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव जाॅन्टी विणकरे यांनी बांधकाम कामाचे कार्यकारी अभियंता यवतमाळ यांच्या कार्यालयात धाव घेवून परिसरातील नागरीकांच्या समस्या मांडल्या.एवढेच नव्हे तर त्यांनी आपल्या कार्यालयाकडून संबंधीत ठेकेदारांना कामाची गती वाढविण्या संबंधी सुचना दयाव्यात अषी मागणी रेठून धरली अन्यथा गांजेगाव येथील पैनगंगा नदीपात्रात वंचीत बहूजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी समाधी आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला.
7 दिवसाचा कालावधी उलटलूनही संबंधीत विभागाने तक्रार मागणीची दखल घेतली नाही कामातही कोणतीही सुधारणा आढळून आली नाही.त्यामुळे वंचित बहूजन आघाडीचे जिल्हामहासचिव जाॅन्टी विणकरे यांच्या नेतृत्वात बांधकाम विभाग व संबंधीत ठेकेदार यांच्या विरूध्द घोषणा देत 17 जून दुपारी 1 वाजता आक्रमक पवित्रा घेत थेट पैंनगंगेच्या नदीपात्रात उतरून जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला . यावेळी त्यांच्या समवेत वंचित बहूजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष धनंजय गायकवाड,ढाणकी न.प.चे नगरसेवक संबोधी गायकवाड,जिल्हामहासचिव डी.के दामोदर,तालूकाध्यक्ष संतोश जोगदंडे,विश्णू वाढेकर,एस.के मुनेष्वर,प्रवेष वाढेकर,विनोद बरडे,देवानंद पाईकराव,पप्पू गायकवाड,सूनिल साखरे,हुसेन मौलाना,भारत राउत,विजय राउत,राहूल झुकझुके,आकाष राउत,रविंद्र हाफसे,गोरक राउत,भारतीय बौध्द महासभेचे तालूका अध्यक्ष धम्मदिप काळबांडे,कैलास मासोळकर,अनिल जोगदंडे,सुमेध खंदारे,गौतम लोखंडे,मच्छिंद्र गायकवाड,सिध्दार्थ झुकझुके,विलास कव्हाणे,विष्वनाथ खीरे,विलास वाढेकर,सुनिल साखरे,इत्यादी कार्यकर्ते नदीपात्रात उतरून त्यांनी जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. कर्तव्यावर हजर असलेले बिटरगाव पोलीस स्टेशनचा फौजफाटा घेवून घटनास्थळी हजर असलेले ठाणेदार प्रताप भोस,उपनिरीक्षक कपील मस्के,बिट जमादार मोहन चाटे,रवि गीते,सतीश चव्हाण,कुसराम,दराटी पोलीस स्टेषनचे पोलीस कर्मचारी धुळे,वसीम भाई व इतर कर्मचारी यांनी आंदोलन कत्र्यांना तात्काळ घटनास्थळावरून ताब्यात घेवून स्थानबध केले.
🔸 जलसमाधी आंदोलनाची तात्काळ दखल घेवून आमच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा कार्यकारी अभियंता यवतमाळ यांच्या कार्यालयासमोर हजोरो कार्यकत्र्यांच्या उपस्थीतीत उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल.
जिल्हामहासचिव
जाॅन्टी विनकरे
