
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
श्री गाडगे महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम
अंतरगाव
जाहीर झालेल्या दहावी व बारावीच्या शालांत परीक्षेच्या निकालात श्री गाडगे महाराज एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित श्री गाडगे महाराज विद्यालयाचा 100% व कनिष्ठ महाविद्यालयाचा 98.57 टक्के निकाल लागला.
यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. दहावीतून प्रथम क्रमांक कु. अनुष्का विजय बुरले (80.60) द्वितीय क्रमांक अनुज ललित मुन (80.20) व तृतीय क्रमांक आदित्य रुद्रेश्वर डफरे (80.00) ह्याचा आला. तसेच बारावी तून प्रथम क्रमांक कु. अनामिका गणेश गुडधे(71.83), द्वितीय क्रमांक कु. दीक्षा अनिल पाथरकर(69.83) व तृतीय क्रमांक कु. तनुजा गणेश कोल्हे (69.00) हिचा आला.
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत असून संस्थेचे अध्यक्ष रविभाऊ एंबडवार यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.तसेच शाळेचे प्राचार्य /मुख्याध्यापक श्री प्रमोदराव भेंडे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी त्यांच्या यशाचे श्रेय सर्वप्राध्यापक, सर्वशिक्षक,शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांना दिले.
