
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
संपूर्ण जगात भारतीय संस्कृतीला एक वेगळे स्थान आहे डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना 27 सप्टेंबर 1925 ला नागपूरला केली . हिंदुत्व राष्ट्रीयत्व व सांस्कृतिक मूल्य जपण्याचे काम स्थापने पासून आज पर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केले आहे असे विचार राळेगाव तालुका संघाच्या वतीने आयोजित विजयादशमी उत्सव व शस्त्रपूजन कार्यक्रमाला उद्बोधन करताना विवेक कवठेकर यांनी विचार व्यक्त केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राळेगाव तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजू रोहणकर, तालुका संघचालक भूपेन्द कारीया प्रमुख म्हणून उपस्थित होते . राम मंदिर परिसरात कार्यक्रमाचे आयोजन केले होते . संघाची भूमिका स्पष्ट आहे या मातीशी इमान राखणारा तो हिंदू आहे संघ शाखेत संस्कार स्वरक्षण व्यक्तिमत्व घडविण्याचे काम होते अगदी लहान वयात संस्कार झाले तर या देशाची पिढी सुसंस्कारित झाल्याशिवाय राहणार नाही असे उपस्थित मार्गदर्शकांनी सांगितले संघाच्या अनेक विंग्स आहे त्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात दुर्गा वाहिनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद वनवासी कल्याण असो अशा कितीतरी संघाशी संलग्न असलेल्या शाखा आहेत त्या देशात काम करत आहे . संघ ही आता बदलतो आहे आम्ही हाप पॅन्ट ला पूर्ण विराम दिला व आता पूर्ण पॅन्ट वापर तो या वेळेस विविध विषयावर विचार मंथन झाले कार्यक्रमाचे प्रास्तावीक मामा चांदे संचालन विकास वाघमारे तर व्यवस्थापन जेष्ठ प्रचारक अंकुश रामगडे यांनी केले या दसरा उत्सवाला तालु क्यातील संघाचे स्वयमसेवक व शहरातील नागरीक उपस्थित होते.
