अल्पवयीन मुलीचा विनयभंग; गुन्हा दाखल नवरगाव येथील घटना

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

मारेगाव तालुक्यातील नवरगाव येथील एका अल्पवयीन मुलगी शौचास गेलेल्या युवकाने हात पकडून एका निंबाच्या झाडाजवळ गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. ही घटना मारेगाव पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या नवरगावात घडली. याबाबत दि. ९ रोजी रात्री उशिरा मुलीच्या तक्रारीवरून मारेगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार मारेगाव तालुक्यातील नवरगाव येथील एक अल्पवयीन मुलगी शौचास जात असतांना गावातीलच २१ वर्षीय युवकाने अल्पवयाचा गैरफायदा घेत वाईट उद्देशाने पिडीताचा हात पकडला व गैरवर्तन करून विनयभंग केला. याप्रकरणी २१ वर्षीय आरोपी गणेश अरूण हादवे याच्यावर विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याबाबत पुढील तपास मारेगाव पोलिस करत आहे.