राळेगाव नगर पंचायत निवडणूक मंगेश राऊत 40 मताने विजयी

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

नुकत्याच झालेल्या नगर पंचायत निवडणुकीत वॉर्ड क्रमांक आठमधून अपक्ष उमेदवार मंगेश राऊत यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांचा पराभव करीत चाळीस मताने विजय संपादन केला. मंगेश राऊत यांनी प्रभाग क्रमांक 8 माता नगर येथून अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. यामध्ये त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेस उमेदवार विनोद मारोतराव नरोड यांचा पराभव केला. मंगेश राऊत यांना 182मते मिळाली तर विनोद नरड यांना 142 मते मिळाली. मंगेश राऊत यांनी चाळीस मताने आघाडी घेऊन विनोद नरोड यांचा पराभव केला. विशेष म्हणजे मंगेश राऊत यांनी काँग्रेस श्रेष्ठींकडे तिकीट मागितली होती पहिल्यांदा काँग्रेस श्रेष्टीने होकार दिला आणि नंतर नाकारून विनोद नरोड यांना तिकीट देऊन निवडणूक रिंगणात उतरविले त्यामुळे मंगेश राऊत यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आणि या काँग्रेस उमेदवाराचा पराभव करीत चाळीस मताने आघाडी घेऊन विजय संपादन केला. त्यांच्या निवडीमुळे वार्ड क्रमांक आठ मध्ये आनंदोत्सव साजरा केला असून आता नागरिकांची काम तात्काळ निकाली निघेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.