
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव पोलिसांनी अवैध दारू वाहतूक व विक्री करणाऱ्या लोकांवर कार्यवाहीचा बडगा उगारला आहे असे चित्र सद्या राळेगाव तालुक्यात दिसुन येत आहे. राळेगाव पोलिसांनी दिनांक ३० एप्रिलच्या मध्यरात्री कळंब वरून वर्धा जिल्ह्यात जाणारी अवैध देशी दारूच्या ३६ पेट्या गाडीसह पकडुन मोठी कार्यवाही केली आहे. राळेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय चौबे यांना अवैध दारू बाबत गोपनीय माहिती मिळाली व त्यांनी राळेगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी अमित मैदलकर, सूरज गावंडे, सचिन नेवारे व प्रकाश मुंडे यांना माहीती दिली व त्यांनी यवतमाळ रोडवर सापळा रचला परंतु गाडी चालकाने गाडी घेउन पळ काढला व पोलिसांनी पाटलाग करून रामतीर्थ जवळ अवैध देशी दारूच्या पेट्या नेणाऱ्या सिफ्ट गाडीला पकडले परंतु चालक फरार झाला. जेव्हा गाडी मध्ये पाहिले तर अवैध देशी दारूच्या ३६पेट्या आढळून आल्या व ती गाडी राळेगाव पोलिस स्टेशनला जमा करण्यात आली या कार्यवाही मध्ये पाच लाख रुपयाचा मुद्द्माल जप्त करण्यात आला ही कार्यवाही राळेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली अमित मैदलकार, सुरज गावंडे, सचिन नवारे व प्रकाश मुंडे यांनी केली.
