

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
महसूल विभागाने मोक्क पाहणी करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी शेतमजूर यांनी केली आहे
राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथिल सततच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पीकांचे व घरांचे नुकसान झाले आहे सविस्तर वृत्त असे राळेगाव तालुक्यात ७ जुलै पासून सतंत कधी मुसळधार पाऊस तर कधी रिमझिम पाऊस सुरू असल्याने रिधोरा येथे काही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून असल्याकारणाने कपाशी, तुर, सोयाबीन पीकांचे मोठे नुकसान झाले आहे तर मागील ७ जुलै पासून सतंत पाऊस सुरू असल्याने रिधोरा येथिल शेतकरी भारती इंगोले यांच्या शेतात सतंतच्या पावसाने पाणी साचून असल्याकारणाने एक एकर कपाशीचे पीक पाण्याखाली गेले आहे तर रामेश्वर कोकाटे यांच्या बैलाच्या गोठ्याची भिंत खचली तर नामदेवराव बळीराम गुरनुले या शेतमजूराची राहत्या घरांची भिंत कोसळली तर वर्षा सुभाष महाजन यांच्याही राहत्या घराची भिंत कोसळली आहे सदर महसूल विभागाने मोक्का पाहणी करून नुकसानभरपाई देण्याची मागणी वरील शेतकरी व शेतमजूर रामेश्वर कोकाटे, भारती इंगोले, नामदेव गुरनुले, वर्षा महाजन यांनी केली आहे
मी पडलेल्या भिंतींची मोक्का पाहणी करून सदर तहसीलदार साहेब यांना अहवाल सादर केला आहे बावनकुळे तलाठी रिधोरा
