
राळेगाव प्रतिनिधि रामभाऊ भोयर (9529256225)
बजाज आलियांज जनरल इन्शुरन्स लि. व दिलासा संस्था घाटंजी यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या लोकसह्भागातून कृषी व उपजीविका विकास कार्यक्रम अंतर्गत राळेंगाव तालुक्यातील लोहारा, एकलारा, कृष्णापूर, श्रीरामपूर, शिवरा, मांडवा, पिंपरी दुर्ग, सोयटी, कोपरी, इंझापूर वालधुर, चिकना व दापोरी अशा एकूण 13 गावांची निवड केली असून, प्रत्येक गावामध्ये ग्रामस्तरावर गाव विकास समिती व महिला समितीच्या माध्यमातून प्रकल्पातील विकास कामे करण्यासाठी समित्यांना मदत करण्यासाठी ग्रामसभेतून कू्षीमित्र यांची निवड करण्यात आली आहे.
या समितीच्या माध्यमातून उपजिवीका उपक्रम राबविले जातात त्यामध्ये सेंद्रिय शेती पध्दत, अल्प खर्चिक पध्दत, फळबाग लागवड, खरिप व रब्बी मध्ये कापूस, तुर व सोयाबीन चे व गहू व हरभरा चे डेमो प्लाँट सेंद्रिय शेती च्या माध्यमातून तयार झालेल्या मालाचे मार्केटींग तसेच दुग्धव्यवसाय, शेळीपालन व्यवसाय, बोकड पालन व्यवसाय, कू्षी औजार बँका स्थापन करणे वन उपज ,मत्स्यपालन व्यवसाय डिजिटलायझेशन सेवेच्या माध्यमातून शासकीय योजनाचा लाभ, अभ्यास दौरा, कृषी आधारित व्यवसायावर डिजिटल मार्केटिंग प्रशिक्षण, लहान उद्योजकांना आर्थिक सहाय्य , जनावरांनसाठी पाणी पिण्याच्या टाके इत्यादी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येणार आहे. शिवरा, पिपंरी दुर्ग , सोयटी, वालधूर व चिकना येथील निवड झालेल्या पशुसखी सदस्याचे 5 दिवसीय मुक्कामी प्रशिक्षण राहुल भवन , पांढरकवडा येथे आयोजित करण्यात आले होते या प्रशिक्षणाला एकूण 12 प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
दिलासा संस्थेचे संस्थापक स्व. मधुकरभाऊ धस व बजाजचे संस्थापक स्व. राहुलजी बजाज यांच्या फोटोचे पूजन करून प्रशिक्षणाचे उद्घाटन विजयाताई धस अध्यक्ष दिलासा संस्था , मनसुर खोरासी कार्यक्रम संचालक, सुभाष मानकर फायनान्स संचालक दिलासा संस्था यांच्या हस्ते करण्यात आले. प्रकल्पाच्या संपूर्ण माहिती याबाबतची माहिती प्रकल्प समन्वयक प्रशांत धनोकार व शेळीपालन व्यवसाय शास्त्रोक्त पद्धतीने कसा करावा या साठी लखनऊ येथील द गोट ट्रस्ट चे तांत्रिक अधिकारी फारुक रायलीवाल व योगराज लांडगे यांनी शेळीपालन व्यवसाय , शेळ्यांच्या जाती, बोकड जाती, दुध क्षमता ,मांसल प्रकार, शेळ्यांचे आजार व उपचार पध्दती आदी संपूर्ण बाबी पशुसखी यांना समजावून सांगितले पुढे पशुसखी यांनी गाव स्तरावर कशी सेवा दयायची यावर राळेगाव तालुका समन्वयक बालाजी कदम यांनी मार्गदर्शन केले पशुसखी यांचे मासिक नियोजन यावर पवन नखाते यांनी मार्गदर्शन केले शेळीपालन व्यवसाय गावागावात वाढला पाहिजे या साठी द गोट ट्रस्ट लखनऊ ही संस्था पुढे 3 वर्षे मार्गदर्शन करणार आहे
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन भाग्यश्री पाटील यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दिलासा संस्थेचे कार्यकर्ते शितल ठाकरे, पुरुषोत्तम राठोड यांनी मदत केली.
