खऱ्या कोरोना योद्धा गेल्या संपावर

. राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225).

यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील सर्व आशा व गटप्रव्रतक यांनी किमान वेतन कायद्यानुसार आशांना दरमहा अठरा हजार रुपये मानधन मिळावे यासह प्रलंबित मागन्याच्या पुर्ततेसाठी आशांनी लाक्षणिय संप पुकारला आहे कोविडच्या कामावर बहिष्कार टाकला आहे.आशा व गटप्रव्रतक संघटना कर्मचारी क्रुती समीती व राज्याचे आरोग्यमंत्री यांच्याशी आशाची बैठक झाली मात्र तोडगा सुटला नाही . जो पर्यंत आमच्या मागण्या मान्य होनार नाही तो पर्यंत हा संप सुरूच राहिल असे एका निवेदनाद्वारे कळविले आहे यामुळे आशांनी आज दिनांक एकविस रोजी विविध मागण्यासाठी राळेगाव तालुक्यातील आशा व गटप्रव्रतक यांनी राळेगाव तहसीलदार , आरोग्य अधिकारी,व ठाणेदार धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्र यांना निवेदन देण्यात आले . यावेळी वंदना कुटे, कल्पना पंधरे,उषा लकमापुरे,अल्का भडे, कांचन किन्नाके, वैशाली चौधरी,अनुसया गेडाम, संजीवनी पिंपळकर,गिता पत्रकार, सुनीता अंबाडेरे, किरण कांबळे,जया मुन, मंजुषा खेडेकर. गटप्रव्रतक माधुरी निशाने,मांडवकर,वनमाला मेश्राम,सोनारखन इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते..