
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
:-महात्मा ज्योतिराव फुले व राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने राज्यस्तरीय ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धा जनकल्याण फाउंडेशन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते कर्तव्यदक्ष पियुषभाऊ रेवतकर यांच्या नेतृत्वात घेण्यात आली होती. त्या प्रश्न मंजुषा स्पर्धेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे देशासाठी योगदान, महात्मा फुले यांचे साहित्य, शाहू महाराजांचा इतिहास ,सामाजिक कार्य व स्त्री शिक्षण चळवळ, भारतीय संविधान, इतर महापुरुष व सामान्य-ज्ञान विषयावर प्रश्न होते. या स्पर्धेमध्ये राज्यस्तरीय तीन बक्षिसे ठेवण्यात आली होती. प्रथम बक्षीस 2000 रु व पुस्तकांचा संच, द्वितीय बक्षीस 1000 रु व पुस्तकांचा संच, तृतीय बक्षीस 500 रु व पुस्तकांचा संच असून प्रत्येक सहभागी स्पर्धकास ई- सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये स्पर्धकांना ६० मिनीट मध्ये १०० सोडविणे गरजेचे होते. 11 एप्रिल ला ही स्पर्धा ऑनलाईन द्वारे संपन्न झाली. या स्पर्धे मध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून 134 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता .या स्पर्धेचा निकाल 14 मे ला जाहीर केला असून स्पर्धेत नाशिक येथील विक्रम शिंदे प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला ,दृतीय बक्षिस भोकरदन येथील अश्विनी पडोळ यांनी प्राप्त केले तर स्पर्धेचे तृतीय बक्षिस सेलू येथील रोहन सोमकुवर यांनी प्राप्त केले .दिनांक 25 मे ला जनकल्याण फाउंडेशन चे प्रदेश अध्यक्ष कर्तव्यदक्ष पियुषभाऊ रेवतकर यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिस वितरण करण्यात येईल .जनकल्याण फाउंडेशन चे राजेश वाघाळे यांनी जनकल्याण फाउंडेशन च्या फेसबुक पेज वरून स्पर्धेचा निकाल जाहीर केला .या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी निकेश ठाकरे ,अथर्व काळे ,चेतन चौधरी ,दर्शना उईके यांनी परिश्रम घेतले.
