
राळेगांव तालुका प्रतिनिधी- रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगांव तालुक्यातील वारा येथे गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या वतीने क्रांतीविर शामादादा कोलाम यांच्या १२२ व्या जयंती निमित्ताने राणी दुर्गावती मडावी यांच्या पुतळ्या जवळ क्रांतीकारक शामादादा कोलाम (वाठोडेकर) यांच्या प्रतीमेसह राणी दुर्गावती मडावी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . गरीबांचा सखा आणि धनदांडग्यांचा कर्दनकाळ असलेले हे भन्नाट वादळी व्यक्तीमत्व २६ नोव्हेंबर १८९९ रोजी कोलाम जमातीमधील अत्यंत गरीब घराण्यात यवतमाळ जिल्ह्यातील तालुका-बाभुळगाव मौजे-कोंढा या लहानशा खेड्यात उदयास आले आणि १ ऑगस्ट १९९९रोजी या भन्नाट जिवन प्रवासाची यात्रा कळंब तालुकयातील निरंजन माहूर येथे कायमची विसावली आणि शामा कोलाम नावाच कुतुहल संपल . यावेळी गोंडवाना गणतंत्र पार्टीचे तालुकाध्यक्ष विठ्ठल धुर्वे दुर्गा पूरके, सुमन घोडाम, इंदिरा पुरके, सुगंधा आत्राम, नर्मदा नरसापूरे, वनिता पूरके, राहुल वाढवेल,श्याम गेडाम, राजू नरसापूरे, राजू वाढवे, हनूमंत तोडासे, गजानन रामगडे,विकास घोडम,अशोक पूरके, प्रविण आञाम, सुर्यभान वाढवे, महादेव रामगडे, या कार्यक्रमात सर्व आदिवासी समाज बांधव उपस्थित होते.
