
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
शहरातील मागील दोन वर्षापासून बस स्टॅन्ड चौक ते वसंत जिनिंग पर्यंत असलेल्या दुभाजकावरील तसेच रावेरी पॉईंट ते आराम मशीन पर्यंत असलेल्या दुभाजकावरील सौंदर्य फुलवणारी फुलझाडे लावण्यात आली आहे मात्र ही सौंदर्य फुलविणारी फुलझाडे पाणी द्या पाणी म्हणत नगरपंचायत च्या दुर्लक्षित पणामुळे अखेरची घटका मोजत आहेत तर तर काही फुलझाडे पूर्णता सुकलेली आहे त्यामुळे नगरपंचायतीचे नगरसेवक गेले तरी कुठे अशी चर्चा शहरवासी करतांना दिसून येत आहे.
मे महिन्यात सूर्य अक्षरशा आग ओकत असून हिरव्यागार झाडांनी मान खाली घालायला सुरुवात केली आहे तर काही झाडे अक्षर :श सुकून गेली आहेत. राळेगाव शहरातील मुख्य ठिकाणावर असलेल्या दुभाजकावरील सौंदर्य वाढविणारी फुलझाडे रस्त्यावरून वाहतूक करणारे प्रवासी फुलझाडे वाळत असल्यामुळे मोठ्या खिन्न नजरेने बघत आहे त्यांच्या तोंडून पाणी द्या पाणी असे शब्द आपसूकच निघत आहेत नगरपंचायतीने हजारो रुपये खर्च करून लावलेल्या सौंदर्य फुलवणाऱ्या फुलझाडाकडे कोणत्याही नगरसेवकांचे लक्ष नसल्याने लावलेली फुलझाडे सुकली आहे तर काही फुलझाडे अखेरची घटका मोजत आहे. त्यामुळे नगर पंचायतीने या दुभाजकावरील सौंदर्य फुलविणाऱ्या फुलझाडांना तातडीने टँकरने पाणी दिल्यास या फुलझाडांना जीवदान मिळू शकेल नाहीतर अखेरची घटका मोजत असणारी फुलझाडे पूर्णतः सुकल्याशिवाय राहणार नाही तरी नगरपंचायतीने तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी शहरात येणाऱ्या नागरिकांकडून व शहरवासीयांकडून करण्यात येत आहे.
