
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात त्रिसंध्या बहुउद्देशीय सामाजिक संस्था यवतमाळ मार्फत रिधोरा परिसरात महिलांना केले मार्गदर्शन सविस्तर वृत्त असे रिधोरा परिसरातील महिलांना मार्गदर्शन सदर(नोंदणी क्रमांक महा ५७३/२०१५ / यवतमाळ) मार्फत ग्रामीण भागातील महिलांना २० जून ते २५ / २०२२ या कालावधीमध्ये महिला सक्षमीकरण, आरोग्य ,शिक्षण त्याचप्रमाणे उपजीविकेबाबत प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये आरोग्यामध्ये स्वच्छतेचे महत्व, संतुलित आहार, पळसबाग ,पळसबागेचे महत्त्व, पळसबागेचे फायदे, शिक्षणाचे महत्त्व या बाबीवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. त्याचप्रमाणे आपली उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून शेतीला जोडधंदा म्हणून विविध व्यवसाय बाबतची माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे विविध शासकीय योजना याबाबत महिलांना सविस्तर माहिती देण्यात आली..
सदर प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षक म्हणून श्री. प्रशांत कदम यांनी प्रशिक्षण दिले.
तर समारोपय कार्यक्रमांमध्ये संस्थेचे अध्यक्ष श्री. तुषार चोपडे यांनी मार्गदर्शन केले.तर ग्रामीण भागातील बऱ्याच महिलांना मार्गदर्शनाचा लाभ घेतला आहे.
