हेल्पिंग हँड्स व वन विभागाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिवस साजरा

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

जागतिक पर्यावरण दिन हा पर्यावरणाला समर्पित एक दिवस आहे आणि पर्यावरणाच्या समस्या बद्दल सामान्य लोकांमध्ये जागृतता पसरवण्यासाठी साजरा केला जातो विविध समाज आणि समुदायातील लोकांना उत्सवात सक्रियपणे सहभागी होण्यासाठी तसेच पर्यावरणीय सुरक्षा उपाय विकसित करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते यंदा जागतिक पर्यावरण दिवस रविवार 5 जून रोजी आहे या वर्षीही जागतिक पर्यावरण दिवसाची थीम ही केवळ एक पृथ्वी आहे ही आहे म्हणजेच आपण सर्व जिथे राहतो ती पृथ्वी एक आहे म्हणून सर्वांनी मिळून या पृथ्वीवरील पर्यावरणाचे संतुलन राखायला हवे पर्यावरणाची काळजी घेत सद्भावनेने आपली पृथ्वी आणि जीवन सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या आजूबाजूने पर्यावरण सुरक्षित ठेवायला हवे जागतिक पर्यावरण दिनाची स्थापना 1972 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी (स्टॉकहोम कॉन्फरन्स आॅन ह्युमन एन्व्हायरमेंट) येथे केली ज्याचा परिणाम मानवी संवाद आणि पर्यावरणाच्या एकात्मतेवर झालेल्या चर्चेतून झाला होता दोन वर्षानंतर 1974 मध्ये “केवळ एक पृथ्वी” या थीम सह पहिला जागतिक पर्यावरण दिवस आयोजित करण्यात आला.
याच संकल्पनेतून दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी एम एच 29 हेल्पिंग हँड्स वन विभागाच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्राथमिक शाळा राळेगाव येथे “झाडे लावा झाडे जगवा” हा कार्यक्रम घेण्यात आला तेव्हा तेथे कार्यक्रमाला उपस्थित यापैकी वनविभागाचे वनपाल एम बी देवकते वनरक्षक आर लोखंडे सचिन कन्नाके, मनोज लाकडे, पशुवैद्यकीय डॉक्टर मिलिंद गवारगुरु तसेच शाळेचे मुख्याध्यापक येनोरकर सर व एम एच 29 हेल्पिंग हँड्स चे तालुकाध्यक्ष संदीप लोहकरे व टीम मधील सदस्य अभिजीत ससनकर, आदेश आडे, सिद्धांत थुल, हनुमान पोटफोडे, दयानंद आडे, जीवन जळीतकर, अभिजित येनोरकर,आदित्य चौधरी, रामा रेड्डी, यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम घेण्यात आला त्यात वन रक्षक आर आर लोखंडे यांनी लोकांना पर्यावरणाविषयी मार्गदर्शन केले व झाडांचे महत्त्व पटवून सांगितले तसेच प्राणीमित्र पर्यावरण प्रेमी संदीप लोहकरे यांनी लोकांना झाडे लावा झाडे जगवा असे आवाहन केले
“पर्यावरण दिनानिमित्त संकल्प!

  • प्रदूषण हटवा पर्यावरण वाचवा
  • श्वास घ्यायला आवडते, झाडे वाचवा
  • हिरवा विचार करा, “झाडे लावा झाडे जगवा”