
तक्रार देवून १० महिने झाले तरी सुद्धा वडकी वीज पुरवठा कंपनीचा एकही अधिकारी येवती येथे फिरकला नाही :रवींद्र बीबेकार शेतकरी
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
.
राळेगाव तालुक्यातील येवती येथील परसोडा शेत शिवारात असलेल्या रवींद्र नथ्थुजी बीबेकार शेत सर्वे नंबर १७६, सुरज रवींद्र बीबेकार शेत सर्वे नंबर १५८,सुनील मधुकर गावंडे शेत सर्वे नंबर १७७,विनायक सोनबा बोठरे शेत सर्वे नंबर १७८ या सर्व शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युतचे सिमेंट पोल अर्ध्या अवस्थेत झुकलेली असुन या संदर्भात वडकी वीज पुरवठा कंपनीला ९ ते १० महिने पुर्वी तोंडी व लेखी तक्रार देवून सुध्दा अजुनपर्यंत वडकी वीज वितरण कंपनीचा एकही कर्मचारी व अधिकारी या शिवारात फिरकलाच नसल्याने या परिसरात शेतकऱ्यांन मध्ये मोठा चर्चेचा विषय बनला आहे.सविस्तर वृत्त असे. वरील सर्व शेतकरी हे येवती येथील असुन यांचे शेत मौजा परसोडा शिवारात असुन यांच्या शेतातुन वडकी वीज पुरवठा कंपनीचे विद्युतचे सिमेंट पोलची लाईन गेली आहे. सिमेंट पोल अर्ध्या पेक्षा जास्त जमीनीवर झुकली आहे.सदर कुठल्याही प्रकारची जीवितहानी न व्हावी म्हणून ६/८/२०२१ रोजी वडकी महावितरण कंपनीला लेखी तक्रार दिली होती.आज ९ ते १० महिने झाले असून सुद्धा वडकी वीज पुरवठा कंपनीचे सहाय्यक अभियंता झोपेचे सोग घेऊन असल्याचे सांगितले जात आहे.संपूर्ण सिमेंट पोल झुकले असल्याने तार सुद्धा जमीनीवर हात पुरते झाले आहे.या मुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.अशा परस्थितीत एखादा अपघात झाल्यास याला जबाबदार कोण? तर आता पावसाळा सुरू झाला आहे. आता तर अर्ध्या अवस्थेत असलेले सिमेंट पोल पुर्णपणे जमीनीवर पडणार आहे. एकदा हे पोल जमीनीवर पडले की शेतकऱ्यांचा ये. जा. करण्याचा रस्ता सुध्दा बंद पडणार आहे.कारण काही सिमेंट पोल रस्त्यावर असल्याने रस्ता बंद पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर का या शिवारातील शेतकऱ्यांचा रस्ता बंद पडला तर या शिवारातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. जर का रस्ता बंद मुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले किंवा एखादा शेतकरी, शेतमजूर ताराला पर्स होवून मरण पावला तर याला जबाबदार वडकी वीज वितरण कंपनी व उपकार्यकारी अभियंता राळेगाव हे जबाबदार राहतील सदर या शिवारातील शेतकऱ्यांची पेरणी, टोबणी झाल्यानंतर शेतकरी झुकलेली सिमेंट पोल ऊभे करु देतील का ? या सर्व विषयाला वडकी वीज पुरवठा कंपनी व उपकार्यकारी अभियंता राळेगाव हे जबाबदार राहतील असे मत रवींद्र नथ्थुजी बीबेकार, सुरज रवींद्र बीबेकार, सुनील मधुकर गावंडे, विनायक सोनबा बोटरे यांनी व्यक्त केले
