खैरी येथे एस.डी.ओ काळे व तहसीलदार डॉ.कानडजे यांची लसीकरण केंद्राला भेट

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

येथे एस. डी. ओ काळे व तहसीलदार डॉ.कानडजे यांनी लसीकरणाला भेट देऊन लसीकरणाची माहिती घेऊन शिल्लक राहीलेले लाभार्थांचे लसीकरण करवुन घ्या, असे सांगितले. खैरी गावाने व सर्व कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले आहे असे पण म्हटले. या भेटी दरम्यान टी. एच. ओ. पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. बरघट, बडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनायकराव जाधव, सरपंच्या किरणताई तृषांत महाजन, उपसरपंच श्रीकांत राऊत, ग्रा. पं. सदस्य रविद्र निवल, ग्रामसेवक मानकर, तलाठी पाटील राजु भेदुरकर, तृशांत महाजन व कोरोना समितीचे सर्व सदस्य उपस्थीत होते.