लालपरी बंदमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

गेल्या एक महिन्यापासून लालपरी रस्त्यावर धावणे बंद झाल्यामुळे सर्व सामान्य वर्ग अडचणीत आला असून आता विद्यार्थ्यांना सुध्दा बस बंद असल्यामुळे शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.

एस.टी. महामंडळातील कर्मचाऱ्यांनी अल्पशा पगारावर किती दिवस बेठबिगारी करायची ५० प्रवाशांना घेऊन जीव धोक्यात घालून चालकाने किती दिवस अल्पशा पगारावर दिवस काढायचे मुलाबाळांचे शिक्षण, आजारपण, दवाखाना अल्पशा पगारावर किती दिवस काढणार ? त्यामुळे शासकीय सेवेत सामावून घ्यावे या मागणीसाठी दि. ८ नोव्हेंबर २०२१ पासून एस टी महामंडळाच्या वाहक, चालक संघटनांनी बेमुदत आंदोलन पुकारले आहे. परिवहन मंत्री व एस टी कर्मचारी यांचा महीनाभन्यापासुन ताळमेळ जुळन राहीला नसल्याने शेवटी एस टी कर्मचारी संघटना न्यायालयात गेली आहे. मात्र लालपरी आगारात धूळ खात पडल्यामुळे आता विद्यार्थ्यांचे नुक्सान होत आहे. आज तालुक्यातील ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थी तालुक्याच्या ठिकाणी शाळेत येतात तर राळेगाव सारख्या ठिकाणावरून दररोज शेकडो विद्यार्थी यवतमाळ मध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी जाणे-येणे करतात. मात्र एस टी बस बंद असल्याने विद्यार्थ्यांचा जाण्या येण्याचा मार्ग बंद शिक्षणा पासून मुकावे लागत आहे. मग शासनाने शाळा सुरु करून काय उपयोग झाला असा पालक वर्गांनी प्रश्न उपस्थित केला आहे. सर्व सामान्य जनता एस टी बस बंद असल्यास खाजगी वाहनाने प्रवास करेल पण विद्यार्थ्यासाठी मिळत असलेली सवलतीची अप-डाऊन पास वेळेवर येणारी बस कशी मिळणार ? त्यासाठी लालपरिचीच गरज मासणार आहे.

तेंव्हा शासनाने व परिवहन मंत्र्यांनी यावर तोडगा काढून विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार •करावा व विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरातील बस उपलब्ध करून द्यावी अशी राळेगाव शहरासह तालुक्यातील पालक वर्गांची मागणी आहे.

कोरोना विषाणूमुळे आधिच गेली दोन वर्षे ऑनलाईन शिक्षणाने गोंधळ घातला यामध्ये हुषार विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर ‘जे उत्तीर्ण होण्याच्या लायकीचे नव्हते तेही गुणवत्ता यादीत ‘आले’ आता कशातरी शासनाच्या आशिर्वादाने शाळा, महाविद्यालये सुरु झालीत मात्र विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी वाहनांची अडचण निर्माण झाली आहे.