एकात्मिक बाल विकास विभागास मिळेना इमारत,प्राथमिक आरोग्य विभागाच्या इमारतीतून चालतो कारभार

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव तालुक्यातील प्रत्येक गावात असणाऱ्या अंगणवाडीचा कारभार ज्या इमारतीतून सुरू आहे त्या एकात्मिक बालविकास विभागाला अद्यापही इमारत नसल्याने या जीर्ण झालेल्या प्राथमिक आरोग्य विभागाच्या इमारतीतून एकात्मिक बाल विकास विभागाचा कारभार चालू असून याकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
तालुक्यात जेव्हा पासून बालविकास विभाग अस्तित्वात आला आहे तेव्हा पासून हे कार्यालय भाड्याच्या इमारतीत चालू होते मात्र त्यानंतर हे कार्यालय प्राथमिक आरोग्य विभागाच्या जीर्ण इमारतीतून चालू आहे. ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावातील अंगणवाड्याचा कारभार ज्या कार्यालयातून पाहिला जातो ती इमारत कार्यालयाची नसून प्राथमिक आरोग्य विभागाच्या इमारतीत सुरू असून या इमारतीवरील फुटलेले कौल भेगा पडलेल्या भिंती व पावसाच्या दिवसात गळती लागणारे कार्यालय अशी अवस्था या इमारतीची झाली आहे या कार्यालयात संगणक व इतर महागड्या वस्तू कार्यालयीन दस्त आहेत त्यामुळे बाल विकास प्रकल्प कार्यालयाचे इमारत नव्याने असणे गरजेचे आहे परंतु याकडे स्थानिक लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष झाले असल्याने या बाल विकास विभाग कार्यालयाचा कारभार जीर्ण इमारतीतून सुरू आहे. शासनाने दिवसेंदिवस अंगणवाडीतील शैक्षणिक आणि भौतिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच अंगणवाडी डीजीटल करण्यावर भर दिला आहे.त्यामुळे अंगणवाड्याचे स्वरूप बदलत गेले आहे मात्र या अंगणवाड्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या एकात्मिक बालविकास विभागाकरिता तालुका स्तरावर कार्यालयात आवळ आहे. तालुक्याच्या ठिकाणी असणाऱ्या कार्यालय बांधकामाला निधीची कमतरता पडावी ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत वादळी वारा आला की या कार्यालयातील कर्मचारी जीव मुठीत घेऊन कार्य करीत असतात कार्यालयात महिला कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असून अंगणवाडी सेविका मदतनीस याची वर्दळ असते तरी देखील कार्यालय सोयीसुविधीचा अभाव आहे.त्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी बाल विकास कार्यालयाची इमारत असने गरजेचे आहे त्याकरिता संबंधित लोकप्रतिनिधी लक्ष अशी द्यावे अशी मागणी सर्वत्र केली जात आहे