वडकी वीज महावितरण कंपनीच्या दुर्लक्षित धोरणामुळे शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव तालुक्यातील खैरगाव (जवादे) येथील शेतकरी प्रकाश केशवराव वाळके शेत सर्व नंबर ७२/१ मौज खैरगाव जावादे या शेतकऱ्याचे १४ ते १५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सविस्तर वृत्त असे. रिधोरा परिसरात १३ एप्रिल रोजी वादळी पाऊस पडला होता या वादळी पावसामुळे खैरगाव जवादे शेत शिवारात शेतातील खंबे तुटून पडले होते याबाबत संबंधित शेतकरी यांनी वडकी वीज पुरवठा कंपनीला लेखी तक्रार देऊन सुध्दा अजुनपर्यंत खैरगाव जवादे येथील शेतकऱ्यांच्या शेतातली तुटलेली लाइन जोडण्यात आली नाही.१३ एप्रिल पासून तर आजपर्यंत खैरगाव जवादे येथील पडलेली लाइन जोडली गेली नसल्याने या परिसरात पाण्या अभावी संपूर्ण पीके उध्वस्त झाली आहे.तर यामध्ये शेतकरी प्रकाश वाळके याची दोन हेक्टर मिरची पाण्याअभावी जळून खाक झाल्याने या शेतकऱ्यांचे १४ ते १५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

      शेतकरी

मी लेखी व तोंडी तक्रार दिली मी सहाय्यक अभियंता गीरी व लाइन मन अतुल काळे यांना वेळोवेळी सागत होतो साहेब माझ्या शेतातली मिरची पाण्याअभावी मरत आहे तुम्ही लवकर लाइट जोडणी करा तर त्यांनी मला असे उत्तर दिले का तुमच्या घाईने लाइट जोडणी होणार नाही. तो आमचा विषय नाही वरुन जेव्हा आम्हाला आदेश येईल तेव्हा आम्ही लाइट जोडू असे सांगितले माझ्या शेतातील दोन हेक्टर मिरची पीक पाण्याअभावी जळून खाक झाल्याने माझे १४ ते १५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे मी याबाबत जिल्हा अधिकारी व मुख्यमंत्री यांच्या कडे लेखी तक्रार दाखल करणार आहे.
शेतकरी
प्रकाश वाळके खैरगाव जवादे