राळेगाव नगरपंचायतच्या कचरा गोळा करणाऱ्या गाड्यावरील कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार

नगरपंचायत राळेगावच्या कार्यप्रणालीवर नेहमीच प्रश्नचिन्ह असते. नगरपंचायत राळेगाव चा ढिसाळ कारभार राळेगावच्या जनतेस पचनी न पडणारा आहे त्यातला एक भाग म्हणजे कचरा संकलन कचरा संकलन हा कचरा व्यवस्थापन प्रक्रियेचा एक भाग आहे घनकचरा जमा करणे आणि विलेवाटीच्या ठिकाणावर व्यवस्थितरित्या टाकणे हे काम कचरा गोळा करणाऱ्या गाडीवाले यांचे आहे परंतु त्यांच्यावर नगरपंचायत चा किंवा ठेकेदाराचा कुठलाही दबाव किंवा लक्ष दिसत नाही कचरा विलेवाटीकरिता सोनुर्ली रोडवर मुरूम खदानी डेपो दिला आहे परंतु हे महाभाग रस्त्यावर कचरा टाकून देतात रोडवर कचरा गाठोडे पडून असताना वाहन चालकांना व रस्त्यावरून ये जा करणाऱ्या लोकांना त्रास होत आहे संबंधित ठेकेदार किंवा नगरपंचायत प्रशासनाने यावर लक्ष द्यावे राळेगाव मध्ये नगर पंचायत चे 17 प्रभाग असून या नगरपंचायत वर एक हाती काँग्रेस पक्षाचा बोलबाला आहे परंतु प्रभागातील समस्या सोडविणे हे त्या त्या प्रभागातील नगरसेवकांचे काम आहे काही नगरसेवक आपल्या प्रभागात फिरून काही प्रमाणात समस्या सोडतात तर काही आपल्या जीवनात सुखी आहे प्रत्येक प्रभागात नालीसफाई, नळाचे पाईप फुटलेले आहे रोज नळ आल्यावर नाली मध्ये पिण्याचे पाणी वाया जात आहे काही प्रभागात चांगल्या रस्त्यावर मोठ मोठ्या गोट्याचा मुरूम टाकून अजून रस्ता खराब केला आहे काही ठिकाणी शहरात कचरा व घाणीचे साम्राज्य आहे लोकसंख्येने मोठ्या असणाऱ्या राळेगाव शहरांमध्ये क्रांती चौक सोडला तर मार्केटमध्ये कुठेही मुतारी संडासची व्यवस्था नाही अशा अनेक समस्याकडे राळेगाव नगरपंचायत प्रशासनाने लक्ष द्यावे ही राळेगावकरांची मागणी आहे.