न्यू इंग्लिश हायस्कूल मध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त विविध उपक्रम ,हरितसेनेच्या वतीने वृक्ष रक्षाबंधन

   


न्यू इंग्लिश हायसकुल व कनिष्ठ महाविद्यालय, राळेगाव येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त विविध उपक्रम दिनांक 9 तें 15 ऑगस्ट पर्यंत आयोजित करण्यात आले असून त्या अंतर्गत शाळेत रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, सायकल रॅली, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून या स्पर्धा मध्ये शाळेतील विदयार्थ्यांनी मोठा प्रतिसाद नोंदविला त्याच प्रमाणे रक्षाबंधन निमित्त हरितसेनेच्या वतीने दिनांक 11 ऑगस्ट रोजी शाळेच्या मैदानावर वृक्षाना राखी बांधून झाडांच्या वृक्षारोपण बाबतीत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. यावेळी संस्थेच्या सचिव अर्चना धर्मे ,प्राचार्य जितेंद्र जवादे,उपप्राचार्य विजय कचरे,पर्यवेक्षक सुरेश कोवे ,हरितसेना प्रभारी शिक्षक अमोल ढुमने यांचे हस्ते वृक्ष रक्षाबंधन करण्यात आले तसेच यासर्व उपक्रमास शाळेतील शिक्षक सूचित बेहरे,नितीन जुणूनकर, गोपाल बुरले, विनोद चिरडे,राजू काळे,निलेश गोरे,मनीषा ईखे,संजय चिरडे,करुणा महकुलकर,वैशाली चौधरी,अनुजा गेडाम ,रेश्मा भोयर,जया ठवरी, प्रफुल्ल चांदेकर ,विनोद तायडे,आनंद घुगे,सचिन दहिकर, प्रवीण कारेकर,अमोल चिरडे,प्रतीक ताकसांडे आदी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व विदयार्थ्यांनी मोठा प्रतिसाद दिला.