लहान भावाने केला मोठ्या भावाचा खून,घाटंजी शहरातील घटना

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी शहरांतील घाटी बेघर परीसरात राहणारे दिपक जोतीराम गेडाम वय २५ मोठा भाऊ त्याचाच लहान भाऊ दिलीप जोतीराम गेडाम वय २१ घरात म्हातारे आई वडील मोठा मुलगा दीपक ह्याला दारू चे व्यसन त्यामुळे तो दारूसाठी तो घरच्यांना नेहमी पैश्यासाठी तगादा लावून झगडा करून रुपये वसूल करून दारू पीत होता. पण काल दि. ११ ला सायंकाळी बाजारात त्याने आईकडे रूपयांची मागणी केली आईकडे पैसे नसल्याने तिने नकार दिला म्हणुन त्याने आईला मारहाण केली ही गोष्ट लहान भाऊ दिलीप ला आईने घरी आल्यावर सांगितली असता दिलीप ने क्षणाचाही विचार न करता घरा समोरच सख्या मोठ्या भाऊ दिपक च्या पोटावर माणेवर चाकूने वार करुन जखमी केले घाटंजी पोलीसात तक्रार दाखल होताच घाटंजी पोलीस स्टेशन चे ठाणेदार मनिष दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय भुजाडे ,पीएसआय सीडाम, जमादार खंडागळे, विशाल वाढई, मेश्ररे, विनोद मेश्राम यांनी घटनास्थळी जाऊन जखमीला यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले पण तिथे तो म्रूत पावला , आरोपी दिलीप मेश्राम याला ताब्यात घेऊन त्यावर कलम ३०२ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनीष दिवटे करीत आहे.