स्वर्गीय कुमारी तेजस्विनी भारत राठोड हिच्या मृत्यूची सखोल चौकशी करून ,न्यायाची मागणी:. – सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर उत्तम दादा राठोड

राळेगाव तालुका प्रतिनिधी :-रामभाऊ भोयर (9529256225)

स्वर्गीय कुमारी तेजस्विनी भारत राठोड, राहणार सेवादास नगर वरोली (तालुका मानोरा) जिल्हा वाशिम या मुलीचा मृतदेह 15 जानेवारी 2022 ला दारवा तालुक्यातील (मान किनी) या तलावांमध्ये मृतावस्थेत मिळाला असून ,ती दिग्रस येतील शाळेमध्ये शिकत होती! तिचा मृतदेह ,राहण्याचे, ठिकाण व शिक्षणाचे ठिकाण ,यामधील तफावत पाहता तिचा घातपात झाल्याची शंका तिच्या आईवडिलांनी व्यक्त केली असून .तिच्या मृत्यूचा सखोल तपास होऊन मृत्यूचे कारण अद्याप प्रशासनाला मिळाले नसून पोलीस प्रशासन हे प्रकरण गांभीर्याने घेत नसल्याची वार्ता समाजात पसरली असून. या पासून समाजमन सुन्न झाले असून समस्त बंजारा समाजाचे,कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी दिग्रस येथील तहसीलदारांना निवेदन देऊन तिच्या कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणी .तहसिलदारामार्फत माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना केली आहे! या प्रसंगी गायत्री फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अडवोकेट डॉक्टर उत्‍तम दादा राठोड तांडा सुधार समितीचे (तालुकाध्यक्ष )तथा कारभारी रमेश पवार, शिक्षक संघटनेचे एल पी राठोड, सर बीडी चव्हाण, सर धीरज आडे, सुजित राठोड ,बंजारा कवी संघटक संघटनेचे ,शंकरगिरी महाराज रायसिंग महाराज ,रमेश महाराज, संजय महाराज, प्रकाश माळी ,गणेश चव्हाण, दिगंबर महाराज ,संतोष महाराज, लखन राठोड ,बाळू जाधव व बरेच बंजारा समाजाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. प्रशासनाने हे प्रकरण गांभीर्याने न घेतल्यास समस्त बंजारा समाजातील पदाधिकारी सोबत घेऊनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा गायत्री फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष एडवोकेट डॉक्टर उत्तम दादा राठोड यांनी दिला! जय सेवालाल, जय महाराष्ट्र