काँग्रेसच्या अंतर्गत कलहाला कंटाळून शेकडोंचा शिवसेनेत प्रवेश,शहराध्यक्षांचे कट्टर समर्थक राजू बोडके यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

गेल्या 30 वर्षांपासून काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असलेले उमरसरा परिसरातील राजू बोडके यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह आज जिल्हाप्रमुख पराग पिंपळे यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश केला.गेल्या वर्षभरामध्ये काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह मोठ्या प्रमाणात उफाळून आला असून पक्षाचे पदाधिकारी एकमेकांची कुरघोडी करण्यातच व्यस्त आहे.यामुळे काँग्रेसमधील सर्वसामान्य कार्यकर्त्यावर परिणाम होत असून महाराष्ट्र प्रदेशातून येणाऱ्या कार्यक्रमांना स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून हरताळ फासला जात आहे.आज अनेक कार्यक्रम आजपर्यंत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जिल्ह्याला दिले.मात्र जिल्हाध्यक्ष स्वतः अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत असताना काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाला वेळ देऊ शकत नसून यामुळे पक्ष संघटना बांधणे कठीण झालेले आहे. अखेर याला कंटाळून काँग्रेसशी 30 वर्षापासून एकनिष्ठ असलेले राजू बोडके यांना ही बाब पचनी न पडल्यामुळे अखेर त्यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.