आदर्श ग्राम निर्माण करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी राष्ट्रसंताचे विचार अंगीकृत करणं काळाची गरज आहे – मधुसूदनजी कोवे गुरुजी

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५३व्या पुण्यतिथी निमित्त “स्मृतीगंध मौन पुष्पांजली “कार्यक्रम राळेगाव तालुक्यातील बोराटी येथे घेवून गुरुदेव सेवा मंडळाचे सादक श्री रमेश खन्नी यांना “तुकड्या ची झोपडी” पुस्तक देवुन सन्मानित करण्यात आले आहे.

स्मृतीगंध मौन पुष्पांजली कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.कृष्णाजी भोंगाडे जिल्हा अध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती यवतमाळ राष्ट्रसंताच्या विचाराचे तत्वज्ञान मांडणारे मार्गदर्शक मा.मधुसुदन कोवे अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच उपस्थित होते.प्रमुख अतिथी मा.इंदरचंद बैद डॉ.अंबादास सोनवणे श्रीधर ढवस उपस्थित होते

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्तानं मार्गदर्शन करताना आज राष्ट्रसंताच्या विचारांची गरज ग्राम समृद्धी साठी अतिशय महत्त्वाची आहे ही भुमिका लोक प्रतिनिधी नी गावा गावात जाऊन मांडली पाहिजे आणि आदर्श ग्राम निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.असे कनखर मतं मा.मधुसुदनजी कोवे गुरुजी यांनी ५३व्या पुण्यतिथी निमित्तानं बोराटी येथे व्यक्त केले आहे.

मौन पुष्पांजली कार्यक्रमाचे आयोजन गुरुदेव सेवा मंडळ बोराटी गुरुदेव सेवक यांच्या सुमधुर भजनानी स्मृतीगंध पुण्यतिथी सोहळ्यात उत्कृष्ट तबला वादक हार्मोनियम वादक आणि गायक यांना नारळ शेला भगवी टोपी घालून सन्मानित करण्यात आले होते

पुण्यतिथी निमित्त आयोजक रमेश खन्नी भैय्याजी मडावी मनोज विलारी संगीता बाई खन्नी तब्बल वादक मेश्राम नितीन ठाकरे देवा मडावी मामा विलारी गुरुदेव सेवक मेश्राम आणि गावातील ग्रामस्थांनी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी कार्यक्रमात सहभागी होवून सहकार्य केले आणि गुरुदेव सेवा मंडळाच्या साधकांनी राष्ट्रवंदना घेऊन मौन पुष्पांजली कार्यक्रमाची सांगता केली.