
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यातील सहकार क्षेत्रातील नेते ऍड प्रफुल भाऊ मानकर यांच्या नेतृत्वात लढविलेली महत्त्वाची सोसायटी जळका येथील एक हाती सत्ता जलका, वरणा, शिवरा, शिरामपुर, कृष्णापुर, व गोपाल नगर या सर्व गावा मिळून सोसायटी असून त्यातील गेल्या पंधरा वर्षापासून एकहाती सत्ता गोविंद चहानकर यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा विश्वास ठेवून 13 पैकी 13 उमेदवार आज रोजी जलका सोसायटी मध्ये निवडून देण्यात आले, त्यात कर्ज गटातून आठ ,विमुक्त भटक्या जाती जमाती मधून एक ,प्रवर्ग ओबीसी एक ,एसटी एक, महिला सामान्य दोन असे एकूण 13 पैकी 13 उमेदवार शेतकरी परिवर्तन पॅनलचे विजयी झाले आहे, त्यांच्या विरोधात परिवर्तन विकास पॅनल हे मातब्बर लोकांचे असून आज रोजी एकही उमेदवार निवडून आणण्यास समर्थ ठरले नाही,त्यामुळे सर्व स्तरावरून गोविंदराव चाहांकर यांच्या नेतृत्वाची वाहवा केली जात आहे.
